बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोणची प्रकृती बिघडली; मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

मुंबई | प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला मुंबई मधील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यावेळी देखील तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावेळी तिच्या प्रकृतीत विशेष सुधारणा आली होती.
मात्र आता पुन्हा प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर घटना तिच्या चाहत्यांना समजल्यावर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे दीपिका पादुकोणने बॉलीवुड वर राज्य केलं आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका देखील साकारली आहे.
तिचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून जातात. मात्र तिच्या अचानक बिघडलेल्या प्रकृती मुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दीपिकाचे करोडोंच्या संख्येत चाहते आहेत. सध्या ती बरी होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाची शूटिंग सुरू होती. त्यावेळी दीपिकाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानतंर काही काळात तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्यावेळी काही काळातच ती ठणठनित झाली, आणि तिची प्रकृती सुधारली.
मात्र आज पुन्हा एकदा तिच्या प्रकृतीत बिघाड झाला. आणि त्यानतंर तिला मुंबई मधील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही काळानंतर लगेच तिला सोडण्यात आले. तिच्या अनेक टेस्ट डॉक्टरांनी केल्या आहेत. सध्या तिची प्रकृति ठिक असल्याचे सांगितले जात आहे.