देश हादरला! मृत्यूशी झुंज अपयशी, ‘सनम बेवफा’ फेम आणि प्रसिध्द दिग्दर्शकाचे निधन
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. बॉलिवूड आणि हॉलिवुड मधील अनेक कलाकार जगाचा निरोप घेत आहेत.
मागील काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या जगाला सोडून गेले आहेत. यातील लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी आणि बऱ्याच कलाकारांचा समावेश होतो. यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा प्रश्न देखील उपस्थित होतो.
आत्ता सध्या अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिध्द दिग्दर्शक सावन कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अचानक प्रकृति बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मृत्युशी झुंज अपयशी ठरली आहे.
गेल्या काही वर्षांपासून त्यांना हृदयाच्या संधर्भात काही आजार झाल्याचे निदान झाले होते. त्यात त्यांना फुफुसांचा देखील त्रास झाला. यात त्यांची प्रकृति अधिकच गंभीर होत गेली. आणि त्यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
सावन कुमार हे ९०च्या दशकात एक प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत. सनम बेवफा सारखे अनेक चित्रपट त्यांनी काढून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
त्यांच्या निधनाने पूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.