चित्रपसृष्टी पुन्हा हादरली! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज जगाचा निरोप घेत आहेत. अनेक जणांचा मृत्यू होत असल्यामुळे अभिनय क्षेत्रात खळबळ उडत आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर लागली आहे. असे म्हटले जात आहे.

 

2022 हे वर्ष अभिनय क्षेत्रासाठी धोक्याच मानलं जातं आहे. या वर्षात अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, रमेश देव तसेच त्या त्या राज्यातील अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागील दुःखातून सावरत असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका आठवड्यात तब्बल 3 अभिनेत्रींचे आयुष्य संपले आहे. 3 अभिनेत्रींनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काल बंगाली अभिनेत्री मंजुषा नियोगी हीचा मृतदेह बेडरूम मध्ये सापडल्यामुळे बंगाली चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

मंजुषाच्या आई वडिलांनी तिला अनेक वेळा फोन लावला मात्र तिने फोन घेतला नाही. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिला तिच्या बेडरूम मध्ये पाहिलं मात्र समोर हे दिसल ते पाहून आई वडिलांच्या पाया खालची मातीच सरकली.

 

बेडरूम मध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ती मृत अवस्थेत आई वडिलांना दिसली, त्यानंतर सदर घटना पोलिसांना कळविण्यात आली पोलिसांनी सदर प्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे. यातील आरोपी कोण आहेत, याचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button