मोठा खुलासा! सलमान खानला आहे 17 वर्षाची मुलगी; दुबईमध्ये राहते पत्नी

मुंबई | बॉलिवूडमधील सलमान खान आणि त्याचे लग्न या दोन्ही भारत पाकिस्तान अशा दोन टोकाला असलेल्या गोष्टी आहेत. आजवर या भाईजानसाठी अनेक मुली फिदा झाल्या. मात्र त्याने अजूनही आपले हृदय कोणत्याच सुंदरीला दिले नाही. सलमानने अता पर्यंत अनेक नवोदित कलाकारांना बॉलीवुडमध्ये आणले त्यामुळे अनेकांसाठी तो देवदूत बनला आहे. आता यातील त्याच्या बरोबरीच्या आणि त्याच्या पेक्षा वयाने खूप लहान असलेल्या सर्वच कलाकारांची लग्ने झाली आहेत.
मात्र सलमान अजूनही अविवाहित आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या कामा प्रमाणे त्याच्या लग्नाची मोठी चर्चा रंगली जाते. यात अनेक जण त्याच्यावर वगेवेगळ्या कमेंट करतात. अशात सध्या एका नेटकऱ्याने सलमानच्या लग्नाचा एक धक्कादायक खुलासा केला. यात त्याने म्हटले की, ” कुठे लपून बसला आहेस तू. आम्हला माहीत आहे तू तुझ्या पत्नी आणि 17 वर्षांच्या मुलीला घेऊन दुबईला गेला आहेस.” नेटकऱ्याच्या या टीकेवर सलमानने देखील उत्तर दिले.
मात्र त्याची खरच पत्नी आहे आणि तिला 17 वर्षांची मुलगी आहे ही गोष्ट ऐकून चाहते पूर्णतः हादरून गेले. यावर उत्तर देत असताना सलमान खान अरबाज खानच्या “पिंच 2” या टॉक शो मध्ये आला होता. यावेळी त्याने “या अफवा असल्याचे सांगितले. तसेच 9 वर्षांपासून गॅलेक्सी अपार्टमेंट माझा पत्ता आहे. मी तिथे राहतो.” असे तो म्हणाला. सलमान खान विषयी अशा अफवा पसरण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील त्याच्या लग्नाच्या अनेक अफवा पसरल्या आहेत. सलमानचे नाव सुरुवातीला ऐश्वर्या राय बच्चन या अभिनेत्री बरोबर जोडले गेले होते.
यावेळी सलमान तिला मारहाण करत असल्याची तिने तक्रार नोंदवली होती. त्यामुळे सलमान भलताच चर्चेत आला होता. तसेच कॅटरिना कैफ या अभिनेत्री बरोबर देखील त्याचे नाव जोडले गेल्याची चर्चा होती. सलमानने अता पर्यंत बॉलीवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींबरोबर प्रेम गीत गायले आहेत. मात्र कोणत्याच अभिनेत्रीने त्याच्या बरोबरच्या नात्याला पती पत्नी हे नाते जोडले नाही.