भारतीय चित्रपसृष्टी हादरली! लोकप्रिय अभिनेत्याचे निधन; 41व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई | नुकतेच “भाबीजी घर पर है” या मालिकेत मलखानची भूमिका साकारणारे अभिनेते दीपेश भान यांचे वयाच्या 41 व्या वर्षी निधन झाले. तरुण अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते अजूनही शोक सागरात आहेत आणि अशातच आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आली आहे. या अभिनेत्याचे वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झाले आहे.

Join WhatsApp Group

 

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील युवा अभिनेता सरथ चंद्रनचे वयाच्या ३७ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. ‘अंगमली डायरीज’ या चित्रपटासाठी तो प्रसिद्ध होता. सरथ चंद्रन मल्याळम भाषेतील प्रसिद्ध अभिनेता होता. ‘अंगमली डायरीज’ व्यतिरिक्त ‘कुडे’, ‘ओरू मेक्सिकन अपराथा’ हे त्याचे खूप गाजलेले चित्रपट आहेत.

 

साल 2022 मध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. लता मंगेशकर, दीपेश भान, बप्पी लाहिरी, गायक केके आणि सिद्धू मुसेवाला यांसारख्या स्टार्सच्या निधनाने चाहते दु:खी झाले होते. आता सरथ चंद्रनच्या जाण्याने चाहत्यांचे मन आणखीनच अस्वस्थ झाले आहे.

 

त्याच्या निधनाची पुष्टी करताना, अभिनेता अँटोनी वर्गीस यांनी “अंगमली डायरीज” मधील सरथ चंद्रनचा फोटो शेअर केला आणि “RIP ब्रदर” असे लिहिले. मृत अभिनेता हा मूळचा कोची येथील होता. सरथ चंद्रनने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी फर्ममध्ये काम केले होते आणि डबिंग कलाकार म्हणून चित्रपटांमध्येही काम केले होते. मल्याळम चित्रपटसृष्टीत त्याने “अनिश्या” या चित्रपटाद्वारे पदार्पण केले.

 

सरथ चंद्रन या अभिनेत्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. मात्र त्याच्या निधनाने चाहत्यांच्या मनात अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहत आहेत. तसेच त्याच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीतील कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button