राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती बाबत मोठी माहिती समोर; डॉक्टर म्हणाले…
मुंबई | १० ऑगस्ट रोजी विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांनी व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर लगेच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गेल्या १५ दिवसापासून त्यांना शुध्द आली नाही. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाल्यापासून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
राजू यांनी शेकडो चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करणं सुरू केलं आहे. राजू यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा येत नसल्याने त्यांच्यावर विशेष डॉक्टर लक्ष देऊन आहेत.
काही दिवसांपूर्वी राजू यांचे हृदय देखील काम करत नसल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यांचा मेंदू देखील काम करत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेंदू मधील एक शीर ब्लॉक झाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा येत नाही.
राजू यांना शुध्दीवर यायला आणखी २ आठवडे तरी lagtilashi शक्यता वर्तवली जात आहे. ते लवकर बरे होण्यासाठी चाहते आणि कुटुंबाच्या कडून पूजा पाठ केले जात आहे. अनेकांनी ते बरे होऊन परत येण्यासाठी देवाकडे प्रार्थना देखील केली आहे. राजू यांना १५ दिवसांनंतर शुध्द आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.