प्रेमात अपयश आल्यामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या; अभिनय क्षेत्रात खळबळ

मुंबई | आयुष्यात सर्व सुख असून देखील ज्यावेळी प्रेमात धोका मिळतो तेव्हा भल्या भल्या वायक्तींचे काळीज कोसळून पडते. असाच काहीसा प्रसंग नसिफा या अभिनेत्री बरोबर घडला. आज याच विषयी अधिक माहिती घेऊ. नफिसा जोसेफचा जन्म 28 मार्च 1978 रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला.
नफिसाच्या वडिलांचे नाव निर्मल जोसेफ आणि आईचे नाव उषा जोसेफ असे आहे. तीच्या आई उषा या रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबातील असून त्या शर्मिला टागोर यांच्या चुलत बहीण आहेत. नफिसाने तिचे शालेय शिक्षण बिशप कॉटन गर्ल्स स्कूल आणि सेंट जोसेफ कॉलेज बंगळुरू येथून केले. नफिसाचे कुटुंब कॅथलिक होते. मात्र तरी तिने मुस्लिम समाजाचे नाव ठेवले होते कारण तिची आजी मुस्लिम होती.
नफिसा जोसेफ लहानपणापासूनच खूप हुशार होती. तिला ग्लॅमरच्या जगाचे भलतेच आकर्षण होते. त्यामुळे तिने वयाच्या १२व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिने एका गोदामाच्या जाहिरातीसाठी शूट केले होते. प्रसाद बिडापा यांनी तिला मॉडेलिंग शिकवली. तेच तिचे पहिले गुरू होते. पुढे १९९७ मध्ये नफीसाने मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी कोरला. 16 मे 1997 रोजी तिने मियामी बीच, फ्लोरिडा येथे मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला आणि या स्पर्धेतील 10 उपांत्य फेरीतील स्पर्धकांमध्ये तिचा समावेश होता.
साल 1999 मध्ये, ती MTV India VJ Hunt साठी जज म्हणून दिसली होती. एका आठवड्यानंतर तिला MTV वर एक शो होस्ट करण्यासाठी स्क्रीन टेस्टसाठी बोलावण्यात आले. तिने जवळपास पाच वर्षे एमटीव्ही हाऊस फुल शो चालवला. तिने सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनसाठी चार्लीज एंजल्सची भारतीय आवृत्ती CATS या टेलिव्हिजन मालिकेत देखील काम केले . 2004 मध्ये तिने स्टार वर्ल्ड वर स्टाईल शो होस्ट केला . तिने तिचा मंगेतर गौतम खंडुजा याच्या मदतीने टेलिव्हिजन प्रोग्रामिंग युनिट 2 ची कंपनी देखील सुरू केली. तसेच गुर्ल्झ नावाच्या मासिकाचे संपादन केले .
मॉडेलिंग आणि होस्टिंग व्यतिरिक्त तिला प्राण्यांचा देखील खूप लळा होता. त्यामुळे तिने वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्स (WSD), पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) आणि पीपल फॉर अॅनिमल्स (PFA), प्राण्यांच्या संरक्षणासाठी संघटनांसाठी प्रचार केला.
तिने गौतम खंडुजासोबत साखरपुडा केला होता. तो आधीच विवाहित होता. मात्र त्याने तिला सांगितले होते की, माझा आणि माझ्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे. मात्र लग्नाच्या काही दिवस आधी तिला समजले की गौतम खोट बोलत आहे. त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला अद्याप घटस्फोट दिलेला नाही. तिला घटस्फोट न देता तो अभिनेत्रीला फसवून तिच्याशी लग्न करतो आहे.
गौतमने तिच्याबरोबर केलेली ही फसवणूक होती पचवू शकली नाही. यामुळे तिने गौतम बरोबर असलेले सर्व संबंध तोडले. ती गौतम वर खूप प्रेम करत होती परंतु हा सर्व प्रकार समोर आल्यामुळे ती खूप डिप्रेशनमध्ये गेली. अशाच परिस्थितीत तिने मोठे टोकाचे पाऊल उचललं. अभिनेत्रीने या सर्व प्रकारामुळे स्वतःच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिच्या निधनानंतर तिच्या आई-वडिलांनी गौतम विरोधात तक्रार दाखल केली. तिचे कुटुंबीय कोर्टापर्यंत पोहोचले. 2005 मध्ये गौतम विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मात्र नसिफाचा मृत्यू गौतममुळे झाला आहे याचा कोणताही पुरावा मिळू न शकल्याने यावरती स्थगिती लावली गेली.