पत्नी आणि लहान मुलीला एकटे सोडून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने घेतला जगाचा निरोप

मुंबई | आज साउथ फिल्म इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री मीना हिचे पती विद्यासागर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मीना यांचे पती विद्या सागर दीर्घकाळापासून फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होते.
त्यांना कोरोनाची देखील लागण झाली. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच नाजूक झाली आणि आज सकाळी त्यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, पण नंतर ते कोरोना आजारातून ठीक झाले होते. त्यानंतर त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे समजले.
साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता सरथकुमारने ट्विट करून ही माहिती दिली आहे. खरं तर, सरथकुमार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर विद्यासागर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीही व्यक्त केली आहे. या बातमीने केवळ अभिनेत्रीचे चाहतेच नाही तर संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. चाहत्यांपासून ते सुपरस्टार्सपर्यंत सर्वजण त्याच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
अभिनेत्री मीना ही तमिळ आणि मल्याळम चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मीनाने जून 2009 मध्ये विद्यासागर यांच्याशी लग्न केले. दोघांना एक मुलगी नैनिका आहे. ती देखील आपल्या आई प्रमाणे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. आता पर्यंत तिने अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून अभिनय केला आहे. पतीच्या आकस्मित निधनामुळे अभिनेत्री आता पूर्णता एकटी पडली आहे. तसेच तिच्या मुलीचा पूर्ण संभाळ आता तिला एकटीला करावा लागणार आहे.
दक्षिणातील सिनेसृष्टीमध्ये मृत्यूच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. काही महिन्यांपूर्वी सलग चार अभिनेत्रींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तसेच गायक के के याचा मृत्यूला सुद्धा सर्व व्यक्ती हळूहळू व्यक्त करत होत्या. अशा दादा पुन्हा एकदा एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने या जगाचा निरोप घेतल्याने मनोरंजन विश्वात शोकाकुल वातावरण पसरले आहे.