आत्ताच्या घडामोडीबॉलीवुड

संगीत विश्वाला मोठा धक्का, आणखीन एका ज्येष्ठ गायकाचे झाले निधन; चित्रपटसृष्टीत शोककळा

मुंबई | बॉलिवूडचे ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये शोक पसरला आहे.

 

त्यांच्या पत्नी आणि गायिका मिताली सिंह यांनी ही माहिती दिली आहे. त्यांची पत्नी मिताली म्हणाल्या की, “त्यांना काही दिवसांपासून आरोग्याच्या अनेक समस्या होत्या.” त्यांनी आजवर ‘मौसम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दूरियां’, ‘हकीकत’ आणि इतर अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. ‘होके मजबूर मुझे, ‘उससे बुला होगा’, मोहम्मद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत देखील त्यांनी गायन केले आहे. ‘दिल धुंदता है’, ‘दुकी पे दुकी हो या सत्ता पे सत्ता’ ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.

 

भूपिंदर सिंग यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे संगीतकार आणि संगीताचा परिचय देणारे नाथा सिंगजी यांच्या पोटी झाला. 80 च्या दशकात भूपिंदर यांनी बांगलादेशी गायिका मिताली मुखर्जीसोबत लग्न केले. त्यांनी मिळून दूरदर्शन आणि मैफिलींवर गझल सादर केली. त्यांना निहाल सिंग नावाचा मुलगा आहे. तो देखील एक संगीतकार देखील आहे.

 

18 जुलै 2022 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी, सिंग यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना कोविड-19 ची लागण झाली होती आणि कोलन कर्करोग असल्याचाही संशय होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

 

पाच दशकांच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी संगीत क्षेत्रातील काही मोठ्या गायकांसोबत काम केले आहे. यामध्ये मोहम्मद रफी, आरडी बर्मन, लता मंगेशकर, आशा भोसले आणि बप्पी लाहिरी या गायकांची नावे आहेत. भूपेंद्र सिंग आणि मिताली सिंग यांच्या जोडीने ‘दो दिवाने शहर में’, ‘नाम गम जायेगा’, ‘कभी किसी को मुक्कम्मल’ आणि ‘एक अकेला इस शहर में’ यासह अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. जी गाणी खूप मोठ्या प्रमाणावर हिट राहिली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button