आत्ताच्या घडामोडी

भारतीचां मोठेपणा! बाळाला चांगले आशीर्वाद मिळण्यासाठी अनाथ आश्रमाला 4 कोटी दान

दिल्ली | द कपिल शर्मा शो फेम भारती सिंग सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिची आणि हर्षची केमेस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. अशात काही दिवसांपूर्वी तिने आपल्या बाळाला जन्म दिला. आणि आता बाळाच्या नावाने ती मोठ्या दानधर्माच्या कार्याला लागली आहे.

 

भारती आणि तिचा पती हर्ष दोघेही एक मेकांवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या मुलाला देखील ते खूप चांगले संस्कार देत आहेत. अशात भारती जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हापासून तिने आपल्या प्रेग्नेंसीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केले. देशात असलेल्या गोर गरीबांची देखील तिला जाणं आहे.

 

आपल्या बाळावर देखील ती खूप प्रेम करते. त्याला अनेकांचे चांगले आशीर्वाद मिळावेत म्हणूनच ती सध्या दान करण्याकडे लक्ष देत आहे. नुकतेच तिने एका अनाथ आश्रमाला ४ कोटींची रक्कम दान केली आहे. आपल्या मुलासाठी एक आई काहीही करू शकते याचंच भारती देखील एक उत्तम उदाहरण बनली आहे.

 

साल २०१९ पर्यंत तिने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम केलं. या शोमुळे ती संपूर्ण भारताची कॉमेडी क्वीन ठरली. ‘द कपिल शर्मा शो’ नंतर ती आणि तिचा पती हर्ष ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये होस्ट म्हणून दिसले. भारतीने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि रियालिटी शोमध्ये काम केलं आहे. २०११ साली आलेला ‘एक नूर’ हा तिचा पहिला चित्रपट होता.

 

सध्या ती ‘द खत्रा खत्रा’ या शोमध्ये कार्यरत आहे. काही दिवांपूर्वीच तिने आपल्या बाळाबरोबर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती आपल्या बाळाला जवळ घेऊन त्याच्यावर प्रेम करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “माझी लाईफ लाईन” या फोटोवर देखील चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तर आता बाळासाठी ४ कोटींचे दान केल्याने सर्वत्र भातीच कौतुक होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button