‘चांडाळ चौकडी’ मधील बाळासाहेबांची खरी बायको माहीत आहे का? दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

बारामती | गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती ही वेबसिरीज तुम्हाला माहीतच असेल, राज्यातील सर्वाधिक पाहणारा वर्ग असणारी ती वेब सिरीज आहे. YouTube आणि फेसबुकवर ही वेबसिरिज दाखवली जाते.

 

या वेबसिरीज ला मिलियन्स मध्ये पाहणारा वर्ग आहे. अवघ्या काही कालावधीत या वेबसिरीज ला रसिकांनी डोक्यावर घेतल्याचे तुम्ही पाहिलं असेल. एका गावातील दोन राजकीय गट आणि गावात होणाऱ्या अनेक घडामोडी या मालिकेत दाखविण्यात आल्या आहेत.

 

यात विशेष आकर्षण बाळासाहेब आणि रामभाऊ यांचं दाखवण्यात आले आहे. बाळासाहेब यांच्या विषयी जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींची माहिती सांगणार आहे.

 

चांडाळ चौकडीच्या करामती मालिकेत बाळासाहेब म्हणजेच भरत पांडूरंग शिंदे यांनी मालिकेतील दारुड्याची भूमिका साकारली आहे. ही भूमिका लाखो रसिकांच्या मनावर राज्य करून गेली आहे. एका खऱ्या खुऱ्या दारुड्या सारखी ही भूमिका बाळासाहेब यांनी साकारली आहे.

 

रसिकांना त्यांची भूमिका फार आवडल्याचे आपण पाहत आहोत. भरत यांचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. मालिका सुरू झाल्यापासून राज्यात ती अव्वल स्थानाची वेब सिरीज ठरली आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यातील माहिती सांगणार आहोत.

 

भरत यांच्या पत्नीचे नाव दुर्गा भरत शिंदे असे आहे. त्या बारामती तालुक्यातील मा.सरपंच आहेत. सध्या भरत आणि दुर्गा या बारामती तालुक्यातील कांबळेश्वर या गावात अस्तित्वात आहेत. त्यांची इच्छा नसताना देखील गावकऱ्यांनी गावाचे नेतृत्व करण्याची संधी बाळासाहेब यांना दिली होती.

 

त्यात त्यांची पत्नी दुर्गा या निवडून आल्या आणि सरपंच पदावर विराजमान झाल्या, त्यांनी गावातील विकास कामात मोठा हातभार लागल्याची माहिती देखील समोर आली आहे. बाळासाहेब पुढील काही दिवसात मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button