आत्ताच्या घडामोडी

भरत जाधवची पत्नी दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील कॉमेडी म्हटलं की पहिलं नाव तोंडात येत ते म्हणजे अभिनेता भरत जाधव याचं, त्याने अनेक चित्रपटात काम करून करोडो चाहते कमविले आहेत. भरत हा विनोदी आणि संयमी कलाकार म्हणून ओळखला जातो.

 

मिळेल ती भूमिका सुंदर रित्या पार करून हजारो चाहत्यांची मन जिंकणाऱ्या भरत बाबत आज आपण माहिती पाहणार आहोत. भरत हा मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करणारा अभिनेता आहे. तो उत्कृष्ट अभिनेत्यापैकी एक आहे.

 

त्याने शेकडो चित्रपटात काम केले आहे. खबरदार, पछाडलेला, माझ्या नवऱ्याची बायको, अग् बाई अरेच्चा!, गलगले निघाले या सारख्या शेकडो चित्रपटात त्याने मुख्य भूमिकेत काम पाहून लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

भरत याचा चाहता वर्ग मोठा असल्यामुळे त्याच्या बद्दल जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता असते. आज आपण त्यांच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या म्हणजेच त्यांच्या पत्नी बद्दल माहिती सांगणार आहोत.

 

भरत याच्या पत्नीचे नाव सरिता आहे. भरत आणि सरिता यांचा प्रेम विवाह आहे. त्यांचे अनेक वर्षापासून एकमेकांवर प्रेम होते. हे प्रेम एका वेगळ्या नात्यात बदलले, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केले.

 

भरत यांची पत्नी सरिता यांच्यामध्ये जास्त वाद झाला नाही. ते एकमेकांसोबत सुखाने संसार करत आहेत. सरिता एक गृहिणी आहे. भरत याच्या यशामागे सरिताचा मोठा हात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button