Best Investment Option In 2026 | अनेकांच्या खात्यावर लाखो रुपये पडून असतात मात्र त्याची योग्य गुंतवणूक करून चांगला परतावा मिळावा असे सर्वांना वाटत असते. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की शेअर मार्केट मधील गुंतवणूक जास्त परतावा देईल की फिक्स डिपॉझिट मधील गुंतवणूक जास्त परतावा देईल. या प्रश्नाचे उत्तर आज आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. Fixed deposit vs stock market returns
तुमच्याकडे जे पैसे शिल्लक आहेत, ते पैसे किती कालावधी साठी गुंतवणूक करणार आहात यावर या मूळ प्रश्नाचे उत्तर मिळेल. कारण जर पैसे कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही फिक्स डिपॉझिट निवडू शकता. आणि जास्त कालावधी साठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवू शकता.
मी तुम्हाला उदाहरणासह सांगतो जर तुमच्याकडे शिल्लक असलेले पैसे तुम्ही ५ वर्षांसाठी गुंतवणार असाल तर शेअर मार्केट मध्ये गुंतवा. आणि १ ते २ वर्षांसाठी गुंतवणार असाल तर फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करा. कारण फिक्स डिपॉझिट मधून तुम्हाला रिटर्न्स कमी येतील मात्र तुमचे पैसे सुरक्षित राहतील.
जर शेअर बाजाराचा अभ्यास झाला असेल तर बाजारात देखील गुंतवणूक करू शकता. रिस्क आहे मात्र परतावा देखील चांगला मिळू शकतो. पण ही गुंतवणूक करताना अतिशय काळजी पूर्वक करावी लागेल. शेअर बाजाराचा पूर्ण अभ्यास करूनच ही गुंतवणूक करा. अनेकजण बाजारात गुंतवणूक करताना अभ्यास न करता करतात आणि यामुळे त्यांना रिटर्न तर भेटतच नाही.
पण मोठ्या आर्थिक नुकसानींना समोर जाव लागत. जर तुमच्याकडे असलेले पैसे अधिक काळासाठी तुम्ही गुंतवणार असाल तर तुमच्यासाठी शेअर मार्केट हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि कमी कालावधी साठी गुंतवणूक करणार असाल तर बँकांमधील FD/RD करू शकता. यातून देखील प्रायव्हेट बँका चांगला रिटर्न तुम्हाला देतील. Best investment option in 2026
FD आणि RD साठी महाराष्ट्रात किती रिटर्न मिळेल? (Best Investment Option In 2026)
FD आणि RD मधील रिटर्न हा तुमच्या वयावर तसेच तुम्ही किती दिवसांसाठी गुंतवणूक करत आहात यावर अवलंबून आहे. सरासरी तुम्ही जर वयोवृद्ध असाल तर तुम्हाला इतरांपेक्षा वार्षिक ०.५ टक्के व्याजदर जास्त दिला जातो. तसेच राष्ट्रीयीकृत बँकेत माजी सैनिक, अपंग आणि महिलांसाठी काही चांगल्या योजना असतात.
वार्षिक व्याजदरात वाढ केलेली असते. जर तुम्ही मोठ्या बँकांमध्ये fd किंवा rd केली तर सरासरी ६ टक्के ते ६.७ टक्के वार्षिक रिटर्न मिळतो. त्याच तुलनेत तुम्ही जर छोट्या बँकांमध्ये जाऊन गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक ७.५ टक्के ते ७.५ टक्के रिटर्न मिळतात. यातील काही छोट्या बँका ८ टक्क्यांपर्यंत देखील रिटर्न देतात. मात्र गुंतवणूक केलेले पैसे सेफ राहतात.
तुम्ही जर बँकांमध्ये fd किंवा rd च्या स्वरूपात जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्तीत जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. मात्र तेच पैसे कमी कालावधी साठी गुंतवायचे असतील तर त्यातून मिळणारा परतावा कमी असू शकतो. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करताना जास्त कालावधी साठी केव्हाही फायदेशीर ठरते.
जर तुम्ही हिच गुंतवणूक पोस्ट ऑफिस मध्ये केली तर ८ टक्क्याहून अधिक व्याजदर तुम्हाला मिळू शकतो. आणि त्यात तुमच्या गुंतवणुकीसाठी काही योजना असतील जसे की इन्सुरन्स अशा गोष्टींचा लाभ तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळू शकतो. ही गुंतवणूक अतिशय सुरक्षित मानली जाते. त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरू शकते.
कालावधी आणि रिटर्न जाणून घेऊ?
जर तुम्ही तुमची शिल्लक रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ३ वर्षासाठी FD किंवा RD स्वरूपात गुंतवत असाल तर तुम्हाला ७ टक्क्यांपर्यंत वार्षिक रिटर्न या बँकेतून मिळू शकतो. आणि तुम्ही जर वृद्ध असाल तर तुम्हाला ७.५ टक्के रिटर्न या बँकेच्या माध्यमातून दिला जातो. काही प्रकरणांमध्ये FD पेक्षा जास्त RD च्या माध्यमातून रिटर्न मिळालेला आहे.
त्यामुळे कोणत्याही बँकेत FD किंवा RD करताना योजना काय आहे. या सर्व गोष्टींची चौकशी करा. जर तुम्हाला तुम्ही गुंतवणूक केलेले पैसे कोणत्या आपत्कालीन परिस्थितीत काढायचे असतील तर त्याचा मोबदला आणि इतर नियम बँकांना विचारून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. राष्ट्रीयीकृत आणि पोस्ट ऑफिस बँक मध्ये गुंतवणूक करणे देशातील सर्वात सुरक्षित मानले जाते.
शेअर मार्केट आणि FD/RD मधील मुख्य बदल आपण पाहू. Stock market returns vs FD returns
| QUIATIONS | शेअर बाजार | FD/RD |
| रिस्क | खूप जास्त | खूपच कमी |
| वार्षिक रिटर्न | १० टक्के ते १५ टक्के | ६ ते ७.५ टक्के |
| किती वर्ष | ५ वर्ष | १ ते ५ वर्ष |
| सुरक्षित – | नाही | हो विमा असतो. |
| मोडणे | कधीही | मोडताना चार्जेस लागू शकतात. |
लोक FD किंवा RD चा पर्याय का निवडतात? मूळ कारण.
लोक रिस्क घ्यायला तयार नसतात. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर रिस्क जास्त असते त्यामुळे मानसिकता हलते. झोप लागत नाही थोडाफार लॉस दिसला तर पॅनिक होतात. या कारणामुळे अनेक नागरिक FD किंवा RD चा पर्याय निवडतात.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक
जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर एकदाच गुंतवणूक करण्याच्या ऐवजी तुम्ही शेअर बाजारात महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवून चांगला प्रॉफिट कमवू शकता. म्हणजे जर तुमचा मासिक पगार किंवा इनकम ५० हजार आहे. तर तुम्ही प्रत्येक महिन्याला शेअर बाजार किंवा SIP मध्ये ५ हजार रुपयांप्रमाणे गुंतवणूक करू शकता.
FAQ – वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न?
बँकांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित आहेत की असुरक्षित आहेत?
उत्तर – सुरक्षित आहेत. कारण गुंतवणूक केलेल्या खातेदारांना ५ लाख पर्यंतचा विमा काढला जातो.
बँकेत गुंतवणुकीवर टँक्स लागतो का?
उत्तर- हो, बँकेत गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या प्रॉफिटला टँक्स लागू केला जातो.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर किती टॅक्स लागू शकतो?
उत्तर – शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंत प्रॉफिटला टॅक्स लागत नाही.
शेअर बाजारात गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित आहेत का?
उत्तर – नाही, शेअर बाजारात तेजी आणि मंदी असते. तुम्ही घेतलेल्या कंपनीचे शेअर तुम्हाला नफा की तोटा करून देतात यावर अवलंबून आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी काय कराव?
उत्तर – शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या पूर्वी तुम्ही शेअर बाजारचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यास झाल्यानंतर ज्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करत आहात त्या कंपनीची बॅक हिस्ट्री पहा. आणि स्वतःच्या जोखमीवर मार्केट मध्ये गुंतवणूक करा.
टिप – महाराष्ट्र अपडेटवर शेअर मार्केट आणि इतर गुंतवणुकीच्या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला फक्त माहितीस्तव माहिती दिली जाते. शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीमध्ये रक्कम गुंतिविण्याचा सल्ला आम्ही देत नाही. तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही गुंतवणूक करावी. Where to invest money for higher returns




