आत्ताच्या घडामोडी

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करून UPSC मध्ये मारली बाजी; मानसीने उंचावली मराठवाड्याची मान

मुंबई | औरंगाबादमधील आणखी एक UPSC नागरी सेवा 2021 रँकर, मानसी नरेंद्र सोनवणे, या वर्षी रँक मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. यंदा महाराष्ट्रातील मानसीने ६२७ वा क्रमांक पटकावला आहे. कला शाखेतील पदवीधर असलेल्या मानसीने तिच्या पदवीच्या दिवसातच यूपीएससीची तयारी सुरू केली. “माझ्या पहिल्या वर्षी, मी परीक्षा आणि UPSC परीक्षा प्रक्रियेबद्दल शिकण्यात थोडा वेळ घालवला.” मी NCERT पुस्तकांपासून सुरुवात केली आणि नंतर refrance पुस्तकांकडे वळले,” असे तिने अभ्यासबद्दल सांगितले.

 

पदवीनंतर लगेचच मानसीने प्रथमच प्रयत्न केला आणि तिसर्‍या प्रयत्नात तिने UPSC CSE 2021 मध्ये 627 क्रमांक मिळवला. पडेगाव येथील रहिवासी असलेले मानसीचे वडिल हे एक लेखाधिकारी आहेत तर तिच्या आई शसकीय सेवेत सेवा देत आहेत.

 

घरची परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने तिचे वडील नरेंद्र यांना या परीक्षेत यश मिळवता आले नाही. त्यांना अभ्यासाठी वेळ मिळत नव्हता. तसेच जास्तीची माहिती घेण्यासाठी पुस्तके देखील त्यांना विकत घेता येत नव्हती. त्यामुळे त्यांना यात यश आले नाही. मात्र त्यांच्या मुलीने यामध्ये मोठी कामगिरी केली. आपल्या वडिलांचे स्वप्न तिने पूर्ण केले.

 

तिच्या या यशात तिला वडिलाचे खूप मार्गदर्शन मिळाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिने इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था अशा सर्व विषयांचा सखोल अभ्यास सुरू केला. वडिलांचे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे तिच्या यशाचे चीज झाले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल सांगताना ती म्हणते की, ” मी तासंतास अभ्यास केला. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांवर अधिक लक्ष दिले. मुलाखतीमध्ये देखील मला या दोन विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. “

 

मराठवाड्यात बरेचसे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेकडे वळतात याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली की, ” मराठवाड्यासारख्या भागामध्ये भाषेचा थोडा अभाव आहे. त्यामुळे अनेक जण एमपीएससी निवडतात. मला भाषेचा कोणताच त्रास नाही.

 

त्यामुळे मी यूपीएससी निवडली. अनेक विद्यार्थ्यांना भाषेचा न्यूनगंड असतो. त्यामुळे ते यामध्ये प्रयत्न सुद्धा करत नाहीत. मात्र तसं न करता त्यांनी बिनधास्तपणे यामध्ये प्रवेश करून अविरत अभ्यास केला पाहिजे.” तिच्या यशामुळे आज संपूर्ण ठिकाणी तिचं कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button