BCCI ची मोठी घोषणा! धोनी भारतीय संघात परतणार

दिल्ली | T20 विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव झाल्याने मोठे बदल करण्याच्या तयारीत सध्या BCCI दिसत आहे. भारतीय संघाचा t 20 कर्णधार देखील तात्पुरत्या स्वरुपात बदलण्यात आला आहे. मात्र हार्दिक पांड्याला काही काळासाठी कर्णधार करण्याच्या तयारीत bcci दिसत आहे. त्यामुळे हे काही मूळ बदल संघात होत आहेत.
यातच आता महेंद्रसिंह धोनी याला संघात परत आणण्याच्या तयारीत BCCI आहे. त्यामुळे सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार पदावर होता. त्यावेळी 2007 या साली भारतीय संघाने t20 विश्वकप जिंकला होता. तसेच 2013 साली Icc ट्रॉफी जिंकली होती. तसेच 2011 साली वनडे विश्वकप भारतीय संघ जिंकला होता.
त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व धोनी अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असल्याचे पाहायला मिळाले. सध्या रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मोठ्या पराभवाला समोर जाव लागले. त्यामुळे भारतीय संघात मोठे बदल करण्यात येणार आहेत. 2023 नंतर धोनी IPL मधून निवृत्ती घेणार आहे. तसेच BCCI त्याला भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करणार आहे.
त्यामुळे याचा थेट फायदा भारतीय संघाला होणार आहे. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी याला अचानक भारतीय संघाचा मेंटर बनविण्यात आले होते. मात्र त्यावेळी संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र तो निर्णय अचानक घेण्यात आला होता. धोनीची नियुक्ती झाल्यानंतर संघ भक्कम होईल असे तज्ञ सांगत आहेत.