बापरे! पोट पुढे आल्याने सर्वांना वाटले बाळ आहे, मात्र ऑपरेशन केल्यावर निघाली भयानक गोष्ट, पाहून चक्रावून जाल

मुंबई | सध्या आजारांचे प्रमाण खूप वाढू लागले आहे. कर्करोग, टीबी, अशा गंभीर आजारांपलिकडे जाऊन काही कधीही न ऐकलेले गंभीर आजार आता हळूहळू समोर येत आहेत. यात लोकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी होणे यामुळे त्यांना खूप त्रास होतो. डोक्यात रक्ताच्या गाठी होणे असे अनेक आजार सध्या पाहायला मिळत आहेत.

Join WhatsApp Group

 

अशात नदिया जिल्ह्याच्या कालीगंज स्टेशनच्या अंतर्गत नसीपुर येथे राहणाऱ्या खोसनेहार बीवी या महिलेला देखील अशाच एका गंभीर आजराने ग्रासले होते. या आजाराने तिला प्रचंड त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून या महिलेचे अचानक पोट वाढू लागले.

 

तिचे पोट वाढत आहे हे पाहून सुरुवातीला घरच्यांनी याकडे जास्त लक्ष दिले नाही. मात्र तीन महिन्यांनी या महिलेचे पोट खूप जास्त वाढले. अगदी एखाद्या बाईला गारोधर असताना सातवा महिना लागतो तेव्हा तिचे पोट जसे मोठे दिसते तसे या महिलेचे पोट दिसत होते. त्यामुळे घरातील व्यक्तींना वाटले की ती प्रेग्नेंट आहे.

 

त्यामुळे त्यांनी तिची अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली. यावेळी महिलेला सुरुवातीला खूप उलट्या होऊ लागल्या. आता प्रेग्नेंट बाईला हे त्रास होतात म्हणून तिच्या सासूने तिची अधिक काळजी घेतली. मात्र नंतर तिला असह्य वेदना होऊ लागल्या. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावली.

 

त्यामुळे कुटुंबीयांना तिची अधिक चिंता वाटत होती. म्हणून त्यांनी तिला एका रुग्णालयात नेले. तिथे गेल्यावर तिला स्त्री रोग तज्ञ महकमा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. तसेच सोनोग्राफी केल्यावर समजले की, तिच्या पोटात बाळ नाही तर भलतेच काही तरी वाढत आहे.

 

सोनोग्राफी रिपोर्ट पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण एव्हढे दिवस तिला वाटत होते आपल्या पोटात बाळ आहे. मात्र तिच्या पोटात बाळ नसून तब्बल १० किलोचा ट्यूमर आहे. डॉक्टरांनी तिच्यावर लगेच शस्त्रक्रिया केली आणि तो ट्यूमर बाहेर काढला.

 

सदर महिलेच्या सासूने देखील यावर अशीच प्रतिक्रिया दिली की, मला वाटले नाही सून प्रेग्नेंट आहे. त्यामुळे तिला त्रास होत आहे आणि तिचे पोट वाढत आहे. मात्र तिच्यात मला काही असामान्य लक्षणे दिसली त्यामुळे मी तिला रुग्णालयात आणले. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. आता ती ठीक आहे. लवकरच डॉक्टर तिला घरी सोडणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button