बापरे! रिंकू राजगुरू सोबत घडली खूपच वाईट घटना!

पुणे | सैराट चित्रपट आला आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक कलाकारांचे आयुष्य पूर्णच बदलून गेलं. सैराट चित्रपटाने करोडो मराठी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. श्रीमंत घरातील मुलगी आणि गरीब घरातील मुलगा जेव्हा हे दोघे एकमेकांवर प्रेम करतात. आणि ते लग्न करण्यासाठी घरातून पळून जातात.
घरातून लांब पळून गेल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांचा यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन तसेच राहायला सुरुवातीला घर नसते. काम नसते आणि यामुळे पैसे मिळत नाहीत. यासाठी असलेला संघर्ष त्यानंतर त्यांना आसरा देण्यासाठी एक महिला मिळते. ती आसरा देते. या दोघांमध्ये वाद होतात.
परशा आरची वर संशय घेतो. त्यानंतर आर्ची परत घरी जाण्यासाठी निघते. परशा तिला खूप शोधतो. आणि त्यानंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. मात्र आर्ची निर्णय बदलते आणि परत परशा कडे येते. आणि परत दोघे सुखी संसार करतात. दोघांना मुलगा होतो. चांगले पैसे देखील कमवू लागतात.
मात्र आर्चिच्या घरचे भेट घेण्यासाठी येतात आणि या दोघांना मारून टाकतात. त्यानंतर पुढे मुलाचे काय होते. हे अद्याप दाखविण्यात आले नाही. असा सैराट चित्रपट होता. या चित्रपटाने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून सैराट मानला जातो.
आणि याच चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेल्या रिंकू राजगुरू सोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. छोट्या पडद्यावर एक बस बाई बस यामध्ये रींकुला बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे यांनी केले होते. त्यांनी रिंकुला काही प्रश्न विचारले.
ते रिंकूला म्हणाले की तुला एखादा भयानक अनुभव आला आहे का? या प्रश्नावर रिंकू राजगुरू ने उत्तर दिले आहे. ती म्हणाली माझ्या घरी एक माझा चाहता आला होता. मी त्या दिवशी घरी नव्हते. त्याने माझ्या घरच्यांना माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली. मात्र मी घरी नसल्यामुळे तो कसाबसा तेथून निघून गेला.
मात्र पुढच्या दिवशी सकाळी तो परत आला. त्याने सोबत पैशाची एक बॅग आणली होती. पैसे देतो पण माझ्या सोबत लग्न कर असे तो म्हणत होता. त्याला आम्ही घरातील सदस्यांनी कसे बसे बाहेर काढले. त्यानंतर आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. असे रींकुने सांगितले.