Bank Holiday March 2026: मार्च महिन्यात तब्बल १२ दिवस राहणार बँका बंद; शासकीय कार्यालये देखील राहणार बंद

March 5, 2026 6:52 AM
Bank Holiday March 2026

Bank Holiday March 2026 | मार्च महिना म्हणजे वर्षातील बँकांचा सर्वात जास्त काम असलेला महिना, मात्र या वर्षी चालू मार्च महिन्यामध्ये देशातील सर्वच बँकांना तब्बल १२ दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमची जर काही महत्वाची कामे अपूर्ण असतील तर तत्काळ बँकेत जाऊन पूर्ण करा, अन्यथा महत्वाच्या कामांना सुट्टी असल्यामुळे विलंब देखील होऊ शकतो.

Bank Holiday March 2026 Date And Festival

०१/०३/२०२६ – रविवार असल्याने सुट्टी
०३/०३/२०२६ – होळी सणाच्या निमित्त सुट्टी
०८/०३/२०२६ – रविवार असल्याने सुट्टी
१४/०३/२०२६ – दुसरा शनिवार असल्याने सुट्टी
१५/०३/२०२६ – रविवार असल्याने सुट्टी
२०/०३/२०२६ – गुढीपाडवा सणाच्या निमित्त सुट्टी
२१/०३/२०२६ – दुसरा शनिवार सुट्टी
२२/०३/२०२६ – रविवार असल्याने सुट्टी
२७/०३/२०२६ – राम नवमी असल्याने सुट्टी
२८/०३/२०२६ – चौथा शनिवार सुट्टी
२९/०३/२०२६ – रविवार असल्याने सुट्टी
३१/०३/२०२६ – महावीर जयंती निमित्त सुट्टी

वरील दिवशी देशातील बहुतेक बँकांना सुट्टी असणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होणार आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्च असतो. या महिन्यात सर्वच बँकांना मोठा कामाचा व्याप असतो. पण यावर्षी बँक कर्मचाऱ्यांना या महिन्यात मोठा आराम मिळणार आहे. तब्बल थोड कमी अर्धा महिना त्यांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमची जर बँकांमध्ये काही महत्त्वाची कामे अडली असतील तर तत्काळ बँकेत जाऊन ती पूर्ण करून घ्यावीत.

फक्त बँकाच नव्हे तर देशातील इतर शासकीय कार्यालये देखील वरील दिवशी बंद असतील. त्यामुळे तुमची जर तहसील, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका या शासकीय कार्यालयातील महत्वाची कामे राहिली असतील तर तुम्ही तत्काळ जाऊन ही काम पूर्ण करून घ्या. अन्यथा महिनाभर तुम्हाला वाट पाहावी लागू शकते. अनेक जणांची मार्च अखेर महत्वाची कामे बँकांमध्ये आणि शासकीय कार्यालयात असतात.

मात्र या मार्च महिन्यात सुट्टी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र यातून जरी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मार्च महिना असल्याने जरी सुट्टीच्या दिवशी त्यांना कामाच्या ठिकाणी बोलवण्यात आले तर बँकेत हजर रहावं लागणार आहे. कारण सर्वच बँकांचे क्लोजिंग हे मार्च महिन्यात होते. आणि कामे अपूर्ण असतील तर बँका कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊ शकतात.

 

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment