बाल बाल बचे बच्चन; पायाचा अपघात होऊन पडले टाके

मुंबई | बिग बी अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच कौन बनेगा करोडपती या रियालिटी शोच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात झाल्याचा खुलासा त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, केबीसीच्या शूटिंगदरम्यान अपघातात त्यांच्या पायाला मोठा दुखापत झाली होती. या अपघात अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली होती. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Join WhatsApp Group

 

अमिताभ यांच्या पायाची नस कापल्यानंतर अमिताभ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वृत्ताने संपूर्ण सेटवर खळबळ उडाली होती. डॉक्टरांना त्यांच्या पायाला टाके घालावे लागले. सध्या डॉक्टरांनी अमिताभ यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी त्यांना जोर देऊन चालायला आणि पायावर दबाव टाकण्यास मनाई केली आहे. याशिवाय त्यांना ट्रेडमिलवरही चालू नका असा सल्ला देण्याात आला आहे.

 

आता चिंता करण्याचे कारण नाही. ते पूर्णपणे बरे आहेत.अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता बरी असली तरी डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी त्यांना पायावर भर देण्यास किंवा चालण्यास मनाई केली आहे. बिग बींनी नुकताच त्यांचा 80वां वाढदिवस साजरा केला.या अपघातामूळे त्यांचे फॅन्स घाबरले आहेत.त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.

 

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिली माहिती:
“धातुच्या धारदार तुकड्याने डावा पाय कापला आणि नस कापली गेली. नस कापली की रक्त अनियंत्रित होते. मात्र कर्मचारी आणि डॉक्टरांच्या टीमने वेळीच केलेल्या मदतीमुळे तो आटोक्यात आला असून पायाला टाके पडले आहेत. ते लवकरच बरे होऊन पुन्हा शूटिंगला सुरुवात करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button