ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती; Ipl मध्ये बजावली होती मोठी कामगिरी

दिल्ली | सध्या क्रिकेट विश्वात चिंता वाढविणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण एका ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडा विश्वात निराशा व्यक्त केली जात आहे. आयपीएल लीग मध्ये या खेळाडूने खुपचं चांगली जबाबदारी पार पाडली होती.
ऑस्ट्रेलिया संघाचा कॅप्टन ॲरोन फेंच याने एकदिवसीय मालिकेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फेंच हा सध्या ऑस्ट्रोलिया संघाचा कॅप्टन आहे. त्याने अनेक सामने खेळून जागतिक क्रिकेट विश्वात मोठ नाव कमवले आहे.
Advertisement
सध्या न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामने सुरू आहेत. अचानक फेंचं याच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याने आयपीएल सामन्यात देखील चांगली भूमिका साकारून भारतीय चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
Advertisement