क्रिकेट विश्वात शोककळा! ऑस्ट्रेलियाच्या प्रसिध्द क्रिकेटरचे अपघाती निधन

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टार क्रिकेटर शेन वॉर्न याच निधन झाल होत. त्यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली होती.

 

त्यातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज खेळाडू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्स चे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

 

अ‍ॅन्ड्र्यू हे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी खेळाडू होते. संघ मोठा करण्यासाठी त्यांचं देखील मोठं योगदान होत. मृत्युवेळी त्यांचं वय 46 वर्ष होते. अपघात होण्याच्या वेळी ते स्वतः गाडी चालवत होते. मात्र गाडी पलटल्याने त्यांचं निधन झाले आहे.

 

त्यांच्या निधनाने ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर नाहीतर पूर्ण जागतिक क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी 26 सामने ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळले आहेत.

 

1997 ते 2007 या वर्षात त्यांनी चांगलाच काळ गाजविली होता. त्यावेळी ते ऑस्ट्रेलिया संघाचे प्रमुख सदस्य होते. संघाच्या वाढीसाठी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान मानलं जात आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button