Ativrushti Nuksan Bharpai: नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 1286 कोटी निधी मंजूर; या तारखेला होणार खात्यात जमा
Ativrushti Nuksan Bharpai Anudan - 2022

Ativrushti Nuksan Bharpai 2022 | सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा पुरता मोडून पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकार अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी वाटप करणार याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Ativrushti Nuksan Bharpai 2022)
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र अशा शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण राज्य सरकारने औरंगाबाद आणि पुणे विभागातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या दिलासादायक वातावरण पसरले आहे. अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास या मेघ राजाने हिस्कावला आहे. (Ativrushti Nuksan Bharpai Anudan 2022)
कांदा, केळी, सोयाबीन, उडीद, तुर या सोबत अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी दुखावला होता. मोठा खर्च करून पीक केले होते. मात्र अतिवृष्टी झाली आणि त्यात पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी मोडून पडण्याची वेळ आली होती. त्यामुळे सरकार कधी मदत करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र सरकारने शेतकऱ्यांसाठी निधी वितरीत करण्याला मंजुरी दिली आहे.
त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होणार आहे. सध्या या मदतीची शेतकरी आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. राज्य शासनाच्या मार्फत विभागीय आयुक्त हा निधी वितरीत करणार आहेत. त्यामुळे लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. १२८६ कोटी ७५ लाख ६५ हजार रुपये निधी वितरणास शासनाने मंजुरी दिली आहे. (Ativrushti Nuksan Bharpai 2022)