हिंदी मालिका विश्वातील प्रसिध्द अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला; मृत्यूशी देत आहे झुंज

ठाणे | अंबरनाथ हे शहर गुन्हेगारी विश्वातील लोकांचा अड्डा बनत चाललेले आहे. दिवसाढवळ्या इथे अनेक व्यक्तींचे खून केले जातात. यामध्ये बऱ्याच वेळा निरागस व्यक्तींचा देखील जीव जातो. अनेकांवरती प्राणघात खाल्ले करण्यात येतात. आता असाच हल्ला एका प्रसिद्ध अभिनेत्यावर देखील झाला आहे. अंबरनाथ शहरामध्ये या अभिनेत्यावरती हा हल्ला झाला आहे. त्यामुळे याची माध्यमांवर प्रचंड चर्चा रंगली आहे तसेच अंबरनाथ हे शहर देखील प्रकाशात आले आहे.
“खिचडी” मध्ये अभिनय करून प्रकाशझोतात आलेला अभिनेता पुनीत तलरेजावर अंबरनाथ शहरात प्राणघातक हल्ला झाला आहे. यामध्ये त्याला प्रचंड दुखापत झाली असून सध्या त्याच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या शहरामध्ये ही घटना घडल्याने पोलिसांनी याची नोंद घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 ऑगस्ट रोजी पुनीत तलरेजा आपली स्कूटर गाडी घेऊन रात्रीच्या वेळी आईसाठी औषध आणायला घराबाहेर पडला होता. यावेळी त्याच्यासमोर आणखीन एक स्कूटर आली. या स्कूटरवर दोन अज्ञात व्यक्ती होत्या. ते दोघेही अचानक त्याला शिवीगाळ करू लागले. पुनीतला काही समजणार तोपर्यंत त्यांनी त्याला लोखंडी रॉडने मारायला देखील सुरुवात केली. यावेळी त्याच्या डोक्यावर आणि खांद्यांवर तसेच पायावर आणि पोटावर देखील जोरदार हल्ला केला गेला.
त्याला मारताना इतर नागरिक कोणीहीमध्ये पडले नाही. रस्त्यावरती तुरळक वाहतूक असताना ही घटना घडली. मारेकरी त्याला मारून तिथून निघून गेल्यानंतर बाकीच्या व्यक्तींनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे पुन्हा एकदा अंबरनाथ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर गुन्हेगार कोण होते? त्यांनी अभिनेत्याला नेमके का मारले? अभिनेत्याने त्यांच्याविषयी काही चुकीचे वक्तव्य अथवा चुकीचे काम केले होते का? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. मात्र अभिनेता सध्या शुद्धीवर नाही. त्यामुळे जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत या तपासाला गती मिळणार नाही असे म्हटले जात आहे.
पुनीत हा टीव्ही महिला विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने 2017 ते 2018 या कालावधीत चाललेल्या चंद्रकांता या मालिकेमध्ये काम केले. त्याआधी प्रचंड गाजलेली मालिका बडी दूर से आये है मध्ये देखील त्याने काम केले. ही मालिका बरेच वर्षे चालली. साल 2014 ते 2016 या कालावधीत ही मालिका सुरू होती. मात्र “खिचडी”मध्ये केलेल्या अभिनयाने पुनीत प्रचंड प्रसिद्धझोतात आला. आता त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चाहते प्रचंड चिंतेत आहेत.