Asia Cup | भारतीय संघाची घोषणा होताच पाकिस्तान संघ भयभीत; पाकला सतावतेय ही भीती?

दिल्ली | आशिया चषक 2022 ची घोषणा झाल्यापासून सर्वच क्रीडा प्रेमींचे लक्ष भारतीय संघाकडे वेधले होते. भारतीय संघामध्ये नेमके कोणकोणते खेळाडू खेळी करणार याविषयी जाणून घेण्यास सर्वांनाच उत्सुकता होती. काल या संघाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानला आता एक वेगळीच भीती सतावत आहे.

 

आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. 20 ऑगस्ट रोजी भारत पाकिस्तान बरोबर तगडी स्पर्धा देणार आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण संघाला घेऊन टी-20 मध्ये पराभूत झाल्यानंतर आता भारतीय संघ पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहिला आहे. बऱ्याचदा पाकिस्तानने विजय मिळवून नेहमीच संपूर्ण जगाला आश्चर्यकारक धका दिलेला आहे. मात्र यावेळी भारताची टीम जोरदार तयारीत आहे.

 

सोमवारी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली. सदर सामना हा दुबईमध्ये होणार असून भारताने यावेळी चार फिरकीपटूंना संधी दिली आहे. भारताच्या या चार फिरकीपटूनमुळे पाकिस्तान चांगलेच घाबरले आहेत. पाकिस्तानकडे विश्वासाचे असे फिरकी पटू फार कमी आहेत. यामध्ये बाबर आझम, मोहम्मद रिजवान आणि शादाब खान यांच्या व्यतिरिक्त पाक कडे विश्वासू फिरकीपटू नाही. त्यामुळे त्यांच्या संघाकडून वारंवार वेगवेगळे ट्विट केले जात आहेत. सावधान गिरी बाळगण्याचे सल्ले अनेक जण देत आहेत.

 

• भारतीय संघ
रोहित शर्मा – कर्णधार, के एल राहुल – उपकर्णधार, ऋषभ पंत- यष्टीरक्षक, दिनेश कार्तिक – यष्टीरक्षक, विराट कोहली दीपक, हुडा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अवेश खान, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह हे स्पर्धक खेळणार आहेत.

 

• पाकिस्तानचा संघ
बाबर आझम – कर्णधार , हैदर अली, शादाब खान, फखर जमान, आसिफ अली, हारिस रौफ, खुशदिल शाह, मोहम्मद वसीम ज्युनिअर, उस्मान कादिर, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, शाहनवाज दहानी, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान हे खेळाडू आहेत.

 

• आता पर्यंत आशिया चषकात भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना
१९८४ – भारताचा विजय ५४ धावांसह
१९८८ – भारताचा विजयी ४ गडी राखून
१९९५ – पाकिस्तानचा विजयी ९७ धावांनी
१९९७ – सामना रद्द कारण पावसाळा
२००० – पाकिस्तानचा विजय ४४ धावांनी
२००४ – पाकिस्तान विजयी ५९ धावांनी
२००८ – ग्रुप स्टेजमध्ये भारताचा विजय, पाकिस्तानचे ६ गडी राखून झाला पराभव
२०१० – भारताचा ३ गडी राखून विजय
२०१२ – भारताचा ६ गडी राखून विजय
२०१४ – पाकिस्तानचा १ गडी राखून विजय
२०१६ – भारताचा ५ गडी राखून विजय
२०१८ – भारताचा ९ गडी राखून विजय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button