दिग्गज क्रिकेटरचे अटक वॉरंट जारी; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

दिल्ली | क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दिग्गज खेळाडूने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर सदर खेळाडू हा देश पातळीवरील संघाचा कर्णधार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Join WhatsApp Group

 

नेपाळ संघाचा स्टार खेळाडू संदीप लामिछान याने एका अल्पवयीन मुलीवर हॉटेल मध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. संदीप याच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट देखील जारी केलं आहे. त्यामुळे संदीप ला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

 

काठमांडू येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर सध्या तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संदीप हा आयपीएल मध्ये दिल्ली संघाकडून खेळला होता. त्यावेळी तो खूपच लोकप्रिय झाला होता. नेपाळ संघाचे गेल्या काही दिवसापासून तो नेतृत्व करत आहे.

 

मात्र त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे नेपाळ क्रिकेट विश्वामधून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. तो एक प्रसिध्द खेळाडू म्हणून ओळखला जातो. अनेक मोठ्या सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. जगातील कोणत्याही लीग मध्ये तो खेळतो. त्याच्या नावाने अनेक विक्रम देखील आहेत.

 

नेपाळ मधील तो एकमेव खेळाडू आहे. जो जगातील कोणत्याही देशातील लीग मध्ये खेळून चांगली कामगिरी करतो. त्याला आयपीएल मध्ये दिल्ली संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. दिल्ली संघाने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते.

 

त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणाला की मी निर्दोष आहे. माझ्यावर अटकेची कारवाई चुकीची आहे. सध्या माझी प्रकृति ठिक नाही. त्यामुळे मी व्यवस्थित बरा होण्याची वाट पाहत आहे. मला बरे वाटू लागले की मी देशात परत येईल. अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button