केंद्र सरकारकडून बेरोजगारांना 3500 रुपये महिना? वाचा यामागील सत्य आणि तथ्य?

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या वतीने देशातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ३ हजार, ५०० रुपये भत्ता देणार असल्याचा मेसेज आपल्या मोबाईलवर आल्यानंतर, आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा मेसेज आपणास आल्यास, आपण अतिशय सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कारण जर आपण या मेसेजच्या पाठीमागचे सत्य पडताळून न पाहता, त्यांना आपली महत्त्वाची माहिती पाठवून दिली तर, आपली फार मोठे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Group

 

मोदी सरकार बेरोजगारांना प्रधानमंत्री बेरोजगार योजनेच्या माध्यमातून ३,५०० रुपयांची दरमहा आर्थिक मदत करणार आहे, अशा प्रकारचा मेसेज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे. या मेसेजची सत्यता पडताळून घेण्याचा प्रयत्न, पीआयबीच्या फॅक्ट चेकने केला आहे. त्यामुळे भयानक सत्य समोर आले आहे. कोरोणा महामारीमुळे देशातील बेकारांच्या संख्येत अतिशय झपाट्याने वाढ झालेली आहे.

 

या मजबुरीचा गैरफायदा उठवत, एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. त्यामध्ये बेकार युवकांना ३,५०० रुपयांचे दरमहा मिळणार आहेत, असा मजकूर लिहिला आहे . मात्र अशा प्रकारची कोणती ही योजना केंद्र सरकारच्या वतीने यापूर्वी सुरू करण्यात आलेली नाही, आणि आत्ता ही सुरू होण्याच्या मार्गावर नाही.

 

यासंदर्भात पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेसाठी प्रि – सुरू झाले असल्याचा, संदेश पाठवला जात आहे. यामध्ये बेरोजगार तरुणांनी आपली नाव नोंदणी केली तर, त्यांना यापुढे प्रत्येक महिन्याला ३,५०० रुपये भत्ता मिळणार असल्याचे ही सांगितले जात आहे. यासाठी एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर आपली सर्व माहिती भरण्यास सांगितले जाते. मात्र आपण याची खातरजमा न केल्यास, आपणास आर्थिक फसवणुकीला बळी पडावे लागू शकते. त्यामुळे अशा मेसेज पासून सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button