आत्ताच्या घडामोडी

अपूर्वाचा नवरा दिसतो फारचं सुंदर; करतो ‘हे’ काम?

मुंबई | झी मराठी वर चालणारी आभास मालिका तुम्हाला आठवत असेल आणि याच मालिकेत काम करून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर देखील तुमच्या परिचयाची असेल. तिच्या भूमिकेमुळे आणि हटक्या अंदाजामुळे कायम ती चर्चेत असते.

 

अपूर्वा ने रात्रीस खेळ चाले या मालिकेत देखील भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती फार प्रकाश झोतात आली होती. अपूर्वा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग चांगलाच वाढला आहे.

 

तिने द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, विल्ला, सब कुशल मंगल या सारख्या दिग्गज चित्रपटांत काम केले आहे. अपूर्वा बाबत खासगी माहिती फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे तिच्या विषयी जाणून घेण्याची इच्छा सर्वांना असते.

 

आज आम्ही तिच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहे. अपूर्वाचा 7 वर्षापूर्वी विवाह झाला आहे. तिने रोहन देशपांडे यांच्याशी लग्न गाठ बांधली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपूर्वा आणि रोहन लग्नाच्या अगोदर 6 वर्ष रेलेशिनशिप मध्ये होते.

 

त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केले. रोहन देशपांडे हे राजकारणात सक्रिय आहेत. ते युवासेनेचे पदाधिकारी होते. त्यांचा प्रवास राजकारणात आहे. मात्र कला आणि राजकारण ही जोड जमली ही एक आश्चयाची गोष्ट आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button