बॉलिवूडला आणखी एक धक्का! राजू श्रीवास्तव यांच्या नंतर आणखी एक प्रसिध्द दिग्दर्शक रुग्णालयात दाखल; प्रकृती गंभीर
मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारण्याच्या आत आणखी एका दिग्गज आणि प्रसिध्द कलाकाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सदर कलाकाराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सावन कुमार असे त्यांचे नाव आहे. सध्या त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहे. हृदयाशी संधर्भात त्यांना आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
९०च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपट काढले. बड्या बड्या कलाकारांना आपल्या चित्रपटात रोल देऊन त्यांनी अभिनय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांना आजार झाला होता. त्यामुळे त्यांना काही दिवसांच्या अंतरावर रुग्णालयात दाखल करण्यात येत होते.
मात्र सध्या पुन्हा त्यांची प्रकृति बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते सध्या ICU मध्ये आहेत. मात्र त्यांची प्रकृति खुपचं चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे.