अनिल कुंबळेन पाकिस्तान संघाला केलं होत ऑल आऊट ; वेस्ट इंडिजविरुद्ध जबडा तुटला तरीही खेळ सुरूच ठेवला होता.

 

Join WhatsApp Group

नवी दिल्ली | अनिल कुंबळे यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1970 रोजी बंगळुरूमध्ये झाला. त्यांनी 1990 साली श्रीलंकेविरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. ते भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहे. त्यांनी एकूण 619 विकेट्स घेतल्या आहे. 18 वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळल्यानंतर कुंबळे यांनी 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कुंबळे यांच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहे. यात एका डावात सर्व 10 विकेट घेण्याचा विश्वविक्रम देखील कुंबळे त्यांच्या नावावर आहे.

 

वनडे क्रिकेट सामन्यातील कारकीर्द:
कुंबळे यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये, 271 सामन्यांमध्ये 237 विकेट घेतल्या आहे. आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये अनेक सामन्यांमध्ये त्यांनी टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.

 

1993 मध्ये खेळल्या गेलेल्या हिरो चषकाच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार गोलंदाजी करत 6 विकेट्स घेतल्या. तर एका क्षणी 4 बाद 101 धावांवर असलेल्या कॅरेबियन संघाचा डाव त्यांनी 123 धावांत आटोपला होता. या कामगिरी कुंबळे यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळख मिळाली होती.

 

जबडा तुटला तरी मैदानात उभे होते कुंबळे:
कुंबळे हे संघासाठी प्रत्येक परिस्थितीत खेळण्यास तयार असत. एकदा 2002 मध्ये अँटिग्वा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना त्यांच्या तोंडाला चेंडू लागला आणि त्याचा जबडा तुटला, त्यामुळे कुंबळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकणार नाही, असं सर्वांना वाटत होते. मात्र, सर्वांना आश्चर्यचकित करत दुसऱ्या डावात कुंबळे गोलंदाजी करायला आले आणि 14 षटकांचा स्पेल टाकून ब्रायन लाराची विकेटही घेतली. त्याचे क्रिकेट आणि संघावरील प्रेम पाहून सगळेच त्याचे चाहते झाले.

 

पाकिस्तानविरुद्ध केलं ऑल आऊट:
पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी पाकिस्तानचे सर्व 10 विकेट्स घेत विश्वविक्रम केला. तेव्हा 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एकही विकेट न गमावता 101 धावांवर खेळत होता, पण कुंबळे यांनी एकापाठोपाठ एक पाकिस्तानच्या फलंदाजांना बाद केल्याने भारताने हा सामना 212 धावांनी जिंकला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button