शुल्लक कारणावरून इंजिनियर तरुणीने घेतला टोकाचा निर्णय, वाचून डोळ्यात पाणी येईल

पुणे | गेल्या काही दिवसापासून तरुण आणि तरुणीच्या आत्महत्या होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामध्ये कधी एकतर्फी प्रेमातून तर कधी छेडछाड वरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातून समोर आली आली आहे. महावितरण मद्ये नोकरीस असलेल्या इंजिनियर तरुणीने ओढनीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अभिलाषा शेळके असे आहे. अभिलाषा ही दक्षिण रायगड मधील गोरेगाव या ठिकाणच्या महावितरण मद्ये कनिष्ठ अभियंता या पदावर काम करत होती. शुक्रवारी सायंकाळी 19 मे रोजी अभिलाषा शेळके हीचा मृतदेह ती राहत असलेल्या महावितरणच्या घरात दिसून आला.

Advertisement

 

वसाहतीमधील नागरिकांनी लगेच पोलीस स्टेशन ला कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु अभिलाषा ने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी अभिलाषा शेळके हीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टम करण्यासाठी सरकारी हॉ्पिटलमध्ये पाठवला.या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *