पाकिस्तान क्रिकेट विश्वात चिंतेचे वातावरण! दिग्गज खेळाडू शोएब अख्तरची प्रकृती चिंताजनक? शेवटचे काही तासच…
दिल्ली | येत्या 27 जुलैपासून एशिया कप सामन्याला सुरुवात होणार आहे. यात भारताचा संघ देखील जाहीर झाला आहे. सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रत्येक क्रिकेट प्रेमीला एशिया कप २०२२ चे वेध लागले आहेत.
अनेक जण सोशल मीडियावर याविषयी वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. एशिया कपवर भारताने या आधी बऱ्याच वेळा विजय मिळवला आहे. या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये होणारी खेळी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. भारताने पाकिस्तानला या खेळात बऱ्याचदा हाणून पाडले आहे. अशात आता पुन्हा एकदा विराट कोहली देखील संघात खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यामध्ये सोशल मीडियावर आधीच्या सामन्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारताचे आधीचे खेळाडू कशा पद्धतीने खेळत होते. कोणी कशी गोलंदाजी केली तसेच कुणाची कशा पद्धतीने विकेट गेली याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, सौरभ, राहुल, सचिन या खेळाडूंची चर्चा रंगलेली असतानाच पाकिस्तानच्या शोएब अख्तर यांची देखील चर्चा रंगलेली आहे.
शोएब यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. मात्र आता ते त्यांच्या मृत्यूची झुंज देत आहे. शोएबयांनी पाकिस्तानी संघातून सेवानिवृत्ती घेऊन आता ११ वर्षे झाली आहेत. मात्र आजही त्यांचा चाहता वर्ग तितकाच मोठा आहे. अशाच आता ते ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.
त्यांना गुडघेदुखीचा अधिक त्रास होत असल्याने त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे त्यांच्या दोन्ही गुडघ्यांवरती शस्त्रक्रिया झाली आहे. जवळपास पाच ते सहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. अशात त्यांनी सोशल मीडिया वरती स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये शोएब भाऊक झालेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते म्हणाले आहेत की, ” गेल्या पाच सहा तासानंतर माझी गुडघ्यांवरची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मी खूप त्रस्त आहे. मला खूप वेदना होत आहेत. मात्र मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.”
क्रिकेटच्या खेळाविषयी ते म्हणाले की, ” रिटायरमेंट घेऊन अकरा वर्षे झाली आहेत. माझ्या गुडघ्यांच्या त्रासामुळे मी लवकरच रिटायरमेंट घेतली. मात्र अजूनही मला हा त्रास होत आहे. मला आशा आहे की, ही माझी शेवटची शस्त्रक्रिया असावी. पाकिस्तानी संघाने मला आतापर्यंत खूप मदत केली. मी अजून चार ते पाच वर्षे खेळू शकलो असतो. मात्र माझ्या गुडघ्यांच्या आजाराने मला लवकरच क्रिकेटमधून निरोप घ्यावा लागला.”
शोएब यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. त्यांचे चाहते या व्हिडिओवरती त्यांना वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी व त्यांना बरे वाटावे अशी प्रार्थना देखील करत आहेत. शोएब या व्हिडिओमध्ये आपल्या आजारपणामुळे भावुक आणि हतबल झालेले दिसत आहेत.