‘तुझ्या माझ्या संसाराला…’ मधील आदितीचे ठरलं लग्न; नवरा दिसतो खुपचं देखणा, करतो ‘हे’ काम

पुणे | गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे लग्न होताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी काही व्यवसायिकांसोबत तर काही आपल्याच क्षेत्रातील व्यक्तींसोबत लग्न करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या अभिनय क्षेत्रात लग्न घाई चालू असल्याचं बोललं जात आहे.
सध्या अशाच एका दिग्गज अभिनेत्रीच्या घरी लग्न घाई सुरू आहे. तिचा हळदी शुभारंभ देखील उरकला असल्याचे सांगितले जात आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत काम करत असलेली आदिती म्हणजेच अमृता पवार ने हळदी उरकल्या आहेत. तिने स्वतः तिच्या Instagram खात्यावर तिच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नील पाटील सोबत तिचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अमृता पवार ने यापूर्वी देखील छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती खूपच चर्चेत आली आहे.