आत्ताच्या घडामोडीठळक बातम्या

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

मुंबई | भारत देशाला कला विश्वात मिळालेला हिरा म्हणजे अमिताभ बच्चन, बच्चन यांनी हजारो चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. बॉलिवूडचा देव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करून गेले आहेत.

 

बच्चन यांचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. ते चित्रपट आणि रिॲलिटी शोमध्ये देखील पाहायला मिळाले आहेत. कोण बनेगा करोडपती या रिॲलिटी शोमध्ये त्यांनी अनेक चाहत्यांची धडकी भरवली आहे. अमिताभ यांचा पुढील काही दिवसात झुंड हा चित्रपट येत आहे.

 

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंड या चित्रपटात अमिताभ यांनी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट फुटबॉल वर आधारित आहे. मात्र सध्या त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चाहत्यांना मोठा झटका बसला आहे.

 

अमिताभ यांचे वय जास्त झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत कायम चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वेळापूर्वी त्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांच्या आरोग्याबाबत आहे.

 

त्यामुळे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. “हृदयाचे ठोके वाढले आहेत. आशा करतो सर्वकाही ठीक असेल.” अशा मायण्याचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याची देखील माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button