रेखा नाही तर या अभिनेत्रीसाठी जीव द्यायला तयार होते अमिताभ बच्चन

दिल्ली | बिग बींचा कौन बनेगा करोडपती हा शो सध्या खूप चर्चेत आहे. सध्या या शोचे 14 वे पर्व सुरू आहे. यात अमिताभ बच्चन यांनी सुंदर सूत्रसंचालन करून अनेकांची मने जिंकली आहेत. अमिताभ बच्चन हे आजही सोशल मीडियावर सक्रिय राहणारे अभिनेते आहेत. अगदी तरुण मुलां मुलीप्रमाणे ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. अशात त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ते चाहत्यांबरोबर शेअर करतात. त्यांनी आजवर सोशल मीडियावर नेहमीच हवा केली आहे.

Join WhatsApp Group

 

त्यांच्या लव स्टोरी विषयी नेहमीच चर्चा रंगली जाते. नेटकरी त्यांच्या प्रेमाची कथा ऐकायला कायम उत्सुक असतात. बिग बींच्या आयुष्यात जया बच्चन यांच्या व्यतिरिक्त रेखा देखील होत्या हे आपल्याला माहीत आहे. ते आजही रेखा यांच्यावर प्रेम करतात याची अनेक वेळा जाणीव झाली आहे. तसेच रेखा आजही आपल्या भांगेत कुंकू भारतात हे कुंकू अमिताभ यांच्या नावाने असल्याचे अनेक व्यक्ती म्हणतात. मात्र आज आपण अमिताभ यांच्या शाळेतील प्रेमाची माहिती जाणून घेणार आहोत.

 

हो रेखा व्यक्तिरिक्त त्यांच्या आयुष्यात शाळेत असलेल्या क्रश विषयी नुकतेच त्यांनी एका सीजनमध्ये सांगितले आहे. यावेळी हॉट सीट वर पूजा बोबडे नावाची स्पर्धक होती. याच शो मध्ये त्यांना त्यांच्या क्रश विषयी आणि शाळेतील आवडत्या मॅडम विषयी विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला. त्यांनी त्यांच्या शाळेत असलेल्या त्या व्यक्तीचे नाव सांगितले.

 

बिग बी म्हणाले की, ” मी शाळेत जास्त हुशार नव्हतो. त्यामुळे मला नेहमी वर्गातून बाहेर काढले जायचे. त्यामुळे मी कोणत्याच शिक्षकाचा आवडता विद्यार्थी नव्हतो. अशात मला देखील शाळेत कोणताच शिक्षक आवडत नव्हता. मला खूप कमी मार्क मिळायचे. त्यामुळे मला सगळे आळशी म्हणून ओळखत होते. ”

 

बिग बी पुढे म्हणाले की, ” शाळेत अनेक सुंदर मॅडम होत्या. मात्र त्यातील सर्वच माझ्यावर ओरडायच्या. त्यातील कोणत्याच मॅडमच्या प्रेमात पडण्याची माझ्यात हिंमत नव्हती. त्यामुळे माझी कोणतीच क्रश नव्हती, आणि असली तरी मी तुम्हाला सांगणार नाही.” अमिताभ यांनी दिलेल्या या उत्तरामुळे सेटवर सर्वच हसू लागले. अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलीवूडला अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले आहेत. आजही ते अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहेत. लवकरच त्यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button