अमिताभ बच्चन यांना केबीसीत अश्रू अनावर; म्हणाले…

 

Join WhatsApp Group

मुंबई | सोशल मीडियावर KBC चा प्रोमो शेअर करण्यात आला. त्यात दिसतेय की, अभिषेक बच्चन अगोदर कौन बनेगा करोडपतीमध्ये हजेरी लावतात. त्यानंतर अचानक जया बच्चन येतात, जया बच्चन यांना पाहून अमिताभ बच्चन भावूक होतात. त्यानंतर अमिताभ बच्चन जया बच्चनजवळ जातात आणि त्यांची गळाभेट घेतात. परंतू यादरम्यान अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले. 11 ऑक्टोबरचा एपिसोड खास असणार आहे. कारण यादिवशी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो.

 

अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपतीमधील हा प्रोमो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो सोनी लिव्हच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये नेमकी काय मस्ती करतात हे पाहण उत्सुकतेचे ठरेल.

 

जया बच्चन यांनी विचारले बच्चनजींना प्रश्न:
आतापर्यंत अमिताभ बच्चन स्पर्धकांना फक्त प्रश्न विचारताना दिसले आहेत. पण आता शोच्या आगामी एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत आणि मेगास्टारची पत्नी जया बच्चन प्रश्न विचारणार आहेत.

 

जया बच्चन अमिताभ यांना प्रश्न विचारतात, जर टाइम मशीन असेल तर कोणत्या वर्षी परत जायला आवडेल आणि का? या प्रश्नावर अमिताभ बच्चन म्हणतात , मला जायला आवडेल…. अमिताभ इतकं बोलतात की मग एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ सुरू होतो. व्हिडिओमध्ये त्यांच्या घराची झलक दाखवण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button