अमिताभ बच्चन दुसऱ्यांदा झाले आजोबा? बाळाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट प्रेग्नेंट राहिल्यापासून बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसीची अफवा पसरायला सुरुवात झाली. यामध्ये करीना कपूर पासून ऐश्वर्या राय पर्यंत अनेक अभिनेत्रींची नावे घेतली गेली. आता अफवांमधील एक बातमी खरी ठरत आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली आहे की अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघांनी एका सुंदर बाळाला जन्म दिला आहे. आराध्या बरोबर खेळण्यासाठी आणखीन एक नवीन पाहुणा बच्चन कुटुंबात दाखल झाला आहे.

 

या बातमीमुळे बच्चन कुटुंबीयांबरोबरच चाहते देखील प्रचंड आनंदात आहेत. सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे. मात्र ऐश्वर्या ही प्रेग्नेंट नसल्याचे नुकतेच तिने स्पष्ट केले होते. मग लगेचच आता तिने एका बाळाला जन्म कसा काय दिला असा देखील प्रश्न चाहत्यांना भेडसावत आहे. अशात या बातमीची सत्यता पडताळून पाहिली असता आमच्या समोर आले की, वायरल होत असलेली माहिती खोटी आहे.

 

परंतु असे असले तरी आराध्या ही आता एकटी नसून तिला एक भाऊ देखील आहे ही माहिती शंभर टक्के खरी आहे. मात्र तिचा हात चुलत भाऊ आहे. अभिषेकच्या चुलत भावाचा हा मुलगा आहे. सोशल मीडियावर आराध्याचा जो फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये ती आणि एक गोंडस बाळ खेळताना दिसत आहे. तसेच बच्चन कुटुंबातील अनेक मंडळींचे या बाळाबरोबर फोटो समोर आले आहेत. त्यामुळे अनेकांचा असा गैरसमज झाला की ऐश्वर्याने आणखीन एका मुलाला जन्म दिला आहे.

 

अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा आजोबा झालेले आहेत. मात्र ते अभिषेक आणि ऐश्वर्या रायने जन्म दिलेल्या मुलामुळे नाही तर त्यांच्या पुतण्याने जन्म दिलेल्या मुलामुळे आजोबा झाले आहेत. सोशल मीडियावर कलाकारांविषयी अशा अनेक बातम्या समोर येत असतात. मात्र यातील कितपत खरे आहेत याची पडताळणी करणे देखील गरजेचे असते.

 

आपल्या आवडत्या कलाकाराविषयी अशा आनंदाच्या बातम्या समोर आल्यावर चाहते भारावून जातात. तसेच सोशल मीडियावर आनंद व्यक्त करण्यास सुरुवात करतात. मात्र या सर्वांमुळे खोटी माहिती जास्त प्रमाणात पसरली जाते. तसेच अनेक चाहते यामुळे गोंधळात देखील पडतात. अमिताभ बच्चन हे बॉलीवूड मधील गाजलेले नाव आहे. आजही हे नाव बॉलीवूडवर राज्य करत आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीच्या बातम्या हमखास पाहायला मिळतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button