अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल? या आजाराशी देत आहेत झुंज

मुंबई | बीग बी अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाने सर्वत्र प्रचलित आहेत. त्यांनी शेकडो चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांनी भारत देशचं नव्हे तर इतर देशातील देखील एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

 

मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीग बी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत. त्यांनी याबाबत स्वतः चाहत्यांना माहिती दिली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत.

Advertisement

 

यात अमिताभ यांना लागण झाल्याने भीतीदायक वातावरण पसरले आहे. यापूर्वी देखील त्यांना कोरोणाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी कोरोनावर मात केली होती. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत.

Advertisement

 

त्यांनी सादर बाब स्वतः सांगितली आहे. तसेच काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. देशात पुन्हा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढू लागली आहे. अमिताभ यांची प्रकृति लवकर ठिक व्हावी अशी इच्छा चाहत्यांच्या मनातून व्यक्त होत आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *