आत्ताच्या घडामोडी

कर्ज घेण्यासाठी कायम या गोष्टी लक्षात ठेवा | Loan Approval Tricks

Loan Approval Tricks | बँकेतून कर्ज घ्यायचे म्हणलं की अनेक अटी आल्या आणि त्या अटी जर पूर्ण केल्या नाहीत तर बँकांकडून कर्ज नाकारले जाते. आज आम्ही तुम्हाला कर्ज मंजूर होण्यासाठी काही ट्रिक्स सांगणार आहोत. त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचे कर्ज मंजूर होऊ शकते. चला तर आज आपण त्या ट्रिक्स नेमक्या कोणत्या आहेत याबाबत माहिती घेऊ.

 

प्रत्येकाला कर्जाची कधी ना कधी गरज पडते. यावेळी आपल्याकडे अनेक बँकांचा पर्याय असतो. मात्र बँकांमध्ये गेल्यानंतर काही बँका कर्ज मंजूर करतात तर काही बँकांकडून कर्ज नाकारण्यात येते. आपल्याला बँकेचे संपूर्ण नियम माहित नसतात. त्यामुळे आपण केलेला अर्ज बँकेच्या कडून फेटाळण्यात येतो. त्यामुळे आपल्याला कर्ज मिळू शकत नाहीत.

 

जर आपण बँकेच्या प्रॉपर नियमानुसार अर्ज केला तर बँका आपला अर्ज नामंजूर करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला त्या नियमांबाबत माहिती सांगणार आहोत. Loan हे अनेक प्रकारचे असते. Personal Loan, Home Loan, Buisness Loan, Car Loan, Bike Loan या आणि बऱ्याच प्रकारचे लोण असते. तुमच्या लोनच्या Amount’ वर तुम्हाला लोन द्यायचे की नाही हे बँक ठरवते.

 

CIBIL SCORE – बँकेतून जर तुम्हाला कर्ज काढायचे असेल तर सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो Cibil score, जर हा Score तुमचा स्ट्राँग असेल तर तुम्हाला बँका लगेच कर्ज देतात. मात्र जर हा Score व्यवस्थित नसेल तर बँका तुमचे कर्ज नामंजूर करतात. त्यामुळे तुमचा cibil कसा वाढेल या कडे लक्ष द्या. तो वाढविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहा.

 

ITR FILING – बँकेतून कर्ज काढायचे म्हणलं की ते तुम्हाला ITR file आहे का? असा प्रश्न विचारतात. जर तुम्ही ITR FILING केली असेल तर तुम्हाला ते तात्काळ कर्ज मंजूर करू शकतात. मात्र जर तुमची ITR FILING नसेल तर तुमचे कर्ज नामंजूर केले जाते. त्यामुळे Itr Filling करत चला. मागील 3 वर्षांची ITR file मागितली जाते.

 

STRONG STATEMENT – तुम्हाला ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे. त्या बँकेत तुमचं खात असेल तर तुम्हाला लवकर कर्ज दिले जाते. जर त्या बँकेत खातं नसेल तर इतर बँकेच्या खात्यामध्ये तुमची दैंनदिंन आवक जावक चांगली असायला हवी. तुमचे व्यवहार जर चांगले असतील तर तुम्हाला बँका लवकर कर्ज देतात. त्यामुळे व्यवहार जेवढे वाढतील याकडे लक्ष द्या.

 

STRONG MORTGAGE – तुम्हाला एखाद्या बँकेकडून 10 लाखाहून अधिक कर्ज घ्यायचे असेल तर बँक तुम्हाला काहीतरी प्रॉपर्टी MORTGAGE करा असे सांगते. यावेळी तुम्हाला Strong Property MORTGAGE करावी लागते. त्यामुळे मोठ्या कर्जासाठी तुमची Strong Property हवी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button