केके आज आपल्यात नाही, मात्र त्याची अजरामर असलेली काही हिट गाणी पाहिलीत का?

दिल्ली | मंगळवारची रात्र बॉलिवूडसाठी एक वाईट बातमी घेऊन आली. कृष्णकुमार कन्नथ उर्फ केके याच्यावर काळाने घाला घातला. केकेने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली. अशात वयाच्या ५३ व्या वर्षी या गायकाची प्राणज्योत मालवली. या बातमीतून त्याने गायलेली काही हिट गाण्यांची एक झलक पाहणार आहोत.

 

• तडप तडप – ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातलं मोठ हिट झालेलं तडप तडप हे गाणं केकेच्या सुरांनी खूप गाजलं होतं. बॉलिवूडमधलं हे त्याचं पहिलं गाणं होतं.

 

• खुदा जाने – या गायकाने अनेक रोमँटिक गाणी गायली आहेत. अशात “खुदा जाने” हे गाणं त्याच्या रोमँटिक गण्यांपैकी टॉपचं गाणं ठरलं होतं. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन अभिनित ‘बचना है हसिनो’ चित्रपटातलं हे गाणं होतं.

 

• मैने दिलं से कहा – ‘रोग’ या चित्रपटातलं त्याच “मैने दिलं से कहा” हे गाणं देखील आज त्याच्या सुरांनी अजरामर झालं आहे. काही टॉप गाण्यांमध्ये या गाण्याचा देखील समावेश आहे.

 

• तू ही मेरी शब हैं – केकेने इमरान हाश्मी, कंगना रणौत आणि शायनी आहुजा अभिनित ‘गँगस्टर’ या चित्रपटासाठी ‘तू ही मेरी शब है’ हे बहुचर्चित गाणं देखील आपल्या आवजत गायलं होतं.

 

• आवरापन बंजारापन – ‘जिस्म’ या चित्रपटातील त्याचं “आवरापन बंजारापन” हे गाणं देखील त्याच्या हिट आणि प्रसिद्ध गाण्यांच्या यादीत प्रामुख्याने घ्यावं लागेल.

 

• पल – केकेने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली होती. अशात त्याने स्वतःचे काही अल्बम देखील काढले होते. यामधील ९० च्या दशकातला त्याचा ‘पल’ हा अल्बम खूप हिट ठरला. त्याचं शेवटचं गाणं हे याच अल्बम मधलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button