राणा आणि अंजली बाईचं लग्न जमलं; गुपचूप उरकला साखरपुडा

पुणे | लाखो रसिकांच्या मनावर राज्य करणारी मालिका “तुझ्यात जीव रंगला” ही तुम्हाला आठवत असेल, ही मालिका सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या मालिकेने लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं होत.

 

यात रानटी गडी पैलवान म्हणून दाखवण्यात आलेल्या राणा दा आणि शिक्षिकेच्या भूमिकेत असलेल्या अंजली बाईची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. ही प्रेमकथा आणि साकारलेल्या भूमिकांनी चाहत्यांच्या काळजावर राज्य केलं होत.

 

अनेक दिवसांपासून राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्न करावे अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांची होती. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे चाहत्यांना मोठं सरप्राइज मिळाले आहे.

 

राणा आणि अंजली बाईने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. लवकरच ते एकमेकांसोबत सात फेरे देखील घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

 

पुढील काही दिवसात ते लग्न करणार आहेत. तसेच पुढील काही दिवसांनी ते सोबत एका चित्रपटात झळकणार असल्याची माहिती देखील सांगितली जातं आहे. अक्षया आणि हार्दिक ने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button