कपिल शर्मामुळे अक्षय कुमार मोठ्या संकटात; म्हणाला…

मुंबई | प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा हा लवकरच आपला शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 10 सप्टेंबर पासून त्याचा हा शो सुरु होणार आहे. त्याच्या या शोने अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. प्रत्येक कलाकार आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या शो मध्ये येत असतो. त्याचप्रमाणे रकुल प्रीत सिंग आणि अक्षय कुमार हे देखील आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथे आलेले आहेत. या शोच्या आगामी भागाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

 

हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे कारण यामध्ये अक्षयने कपिल वरती काही आरोप केले आहेत. या आरोपांमुळे कपिल शर्माकडे सर्वच जण वेगळ्या नजरेने पाहत आहेत. अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले. मात्र 2022 मध्ये आलेले त्याचे चित्रपट फार कमाल करू शकले नाहीत. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन असे एका मागोमाग एक त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आफटले आहेत.

Advertisement

 

त्यामुळे या सर्वांवरून त्याने कपिल शर्मावर काही आरोप लावले आहेत. वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कपिल अक्षयला म्हणतो की तो दरवर्षी थोडा थोडा कमी होत चालला आहेस. यावर अक्षय कुमार म्हणतो की, “कसा आहे हा प्रत्येक गोष्टीला नजर लावत असतो. आता याने माझ्या चित्रपटांच कौतुक केलं म्हणजे आता माझ्या चित्रपटांना नजर लागली आहे. याच्यामुळे माझा एकही चित्रपट चालत नाही. माझे सर्व चित्रपट फ्लॉप ठरत आहेत.” असे अक्षय यामध्ये म्हणतो आणि संपूर्ण सेटवर एकच हशा पिकलेला दिसतो.

Advertisement

 

अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. ज्यामध्ये पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा, रावडी राठोड असे अनेक बहुसंख्य चित्रपट आहेत. मात्र यंदाचे वर्ष त्याच्या चित्रपटांसाठी अनलकी ठरत आहे. त्याचे तीन ते चार चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत मात्र एकही चित्रपट चांगली कमाई करू शकलेला नाही. नुकताच त्याचा कटपुतली हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट देखील फ्लॉप ठरत चालला आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *