अक्षय कुमारने पुण्याच्या मिसळीवर मारला ताव

मुंबई | बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या आव्हानात्मक भूमिकांनी प्रेक्षकांना चकित करत असतो. अगदी कॉमेडी पासून ते गंभीर आणि अँक्शन भूमीकांपर्यंत त्याने अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने लाखोंचा चाहता वर्ग गोळा केला आहे.

 

नव्वदच्या दशकात त्याने अनेक रोमँटिक चित्रपटांत काम केले. यावेळी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. अशात आता त्याने पन्नाशी ओलांडली आहे. मात्र आजही त्याचा अभिनय आणि त्याचा फिटनेस विशीच्या मुलाला लाजवणारा आहे. त्याचं वय त्याच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही.

 

तो आपल्या तब्येतीला खूप जपतो. फिट राहण्यासाठी पहाटे लवकर उठून व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे या सर्व गोष्टी तो न चुकता पळतो. त्यामुळेच तो अजूनही इतका फिट आहे. मात्र नुकताच तो पुण्यात गेला होता. इथे आल्यावर मात्र पुणेरी मिसळ पाहून त्याने आपल्या जुभेवरचा ताबा घामावला आणि त्याने पुणेरी मिसळ चाखली. ही मिसळ त्याला खूप आवडली.

 

तसेच यावेळी त्याने झुंका आणि भाकरीवर देखील ताव मारला. यावेळी त्याने दोन घास जरा जास्तच खाल्ले कारण त्याला ही मिसळ खूप आवडली होती. त्यामुळे नंतर त्याने मिसळचा आस्वाद घेत असतानाचे काही फोटो देखील पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, ” प्रत्येक पुणेकराचा जीव की प्राण आणि शान असलेला मिसळ पाव… एवढी चविष्ट मिसळ खायला देऊन आमचा आत्मा तृप्त केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद… खूप छान!” असे त्याने लिहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button