अक्षय कुमारला प्रभू श्रीराम पावला..पहिल्याच दिवशी ‘रामसेतू’ चित्रपटान कमावले एवढे कोटी..

मुंबई | बॉलिवूडचा कुमार खिलाडी अर्थातच अक्षय कुमार याचे वर्षाला 3 ते 4 सिनेमे प्रदर्शित होतात. एवढच नाही तर सद्या अक्षय कुमारचा रामसेतू हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक श्रम यांन केलंय. याच सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाल केलीय. जवळ जवळ 15 कोटी पर्यंत या सिनेमानं मजल मारलीय.

Join WhatsApp Group

 

 

रामसेतूने ‘थॅंक गॉड’ या सिनेमाला मागे टाकलं आहे. रामसेतू या सिनेमाची ‘थॅंक गॉड’ या सिनेमाशी तुलना केली तर थॅंक गॉड’ या सिनेमानं पहिल्या दिवशी 8 कोटींची कमाई केली होती. रामसेतू एक ॲडव्हेंचर ड्रामा आहे. ही गोष्ट एका अर्कियेलोजिस्टीकची आहे. अशावेळी तो रामाचा शोध घेत असतो. याचवेळी त्याची पर्भू श्रीरामावर श्रद्धा जडते. मंगळवारी भारताच्या कितीतरी सिनेमागृहात प्रेक्षकांनी सिनेमा पाहता-पाहताच ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या. रिलीजनंतर पहिल्या दिवशी ‘रामसेतू’ला बॉक्सऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला.

 

 

रामसेतू हा सिनेमा 3100 स्क्रीन्सवर प्रदर्शित:
रामसेतू’ देशभरात जवळपास 3100 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाचं बजेट 85 करोड सांगितलं जात आहे. आणि याबाबतीत इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की राम सेतू सोबतच मंगळवारी २५ ऑक्टोबर रोजी अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थॅंक गॉड’ सिनेमा रिलीज झाला आहे. तर हॉलीवूडचा ‘ब्लॅक अॅडम’ देखील बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

 

 

रामसेतूने पहिलेच दिवशी उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात येथे चांगली कमाई केली. तसेच याच चित्रपटान मुंबई मधून 5 कोटींची कमाई केल्याचं समजतंय. दक्षिणेस रामसेतू हा फारशी कामगिरी करू शकला नाही. परंतु अस असल तरीही ब्रह्मास्त्र या सिनेमापेक्षा रामसेतू एक पाऊण पुढेच आहे. बच्चन पांडे’,’सम्राट पृथ्वीराज’,’रक्षाबंध’ हे सिनेमे पडले परंतु रामसेतू या सिनेमानं चांगली कामगिरी केल्याने रामसेतू हा जमेची बाजू ठरलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button