अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा झाला बाप; सोशल मीडियावर पोस्ट लिहून दिली खुशखबर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडिया मधून बाहेर असलेला खेळाडू अजिंक्य राहणे याने दुसऱ्यांदा एक मोठी खुशखबर दिली आहे. तो दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याला यापूर्वी काही दिवसांपूर्वी मुलगी झाली होती. त्यानंतर आता त्याला मुलगा झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली.
त्यात तो म्हणाला की, मी आणि राधिका ने नवीन जन्मलेल्या बाळाचे स्वागत केले. राधिका आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. तुमच्या प्रेमासाठी आणि आशिर्वादासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. अशा शब्दात त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
2014 मध्ये त्याने राधिका सोबत विवाह केला. राधिका आणि अजिंक्य दोघे लहान पनापासूनचे मित्र मैत्रीण आहेत. एकमेकांवर प्रेम जडल आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2014 साली त्यांनी थाटामाटात विवाह केला. आणि 2019 मध्ये मुलीला जन्म दिला. त्या मुलीचे नाव आर्या ठेवण्यात आले आहे.
सध्या अनिंक्यला मुलगा झाला आहे. त्यामुळे चाहत्यांमधून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो टीम इंडिया पासून दूर आहे. मात्र त्याला मुंबई संघाकडून सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.