अजय देवगणच्या कुटुंबातील सदस्याचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

 

Join WhatsApp Group

मुंबई | घरातील एका खास व्यक्तीच्या निधनाने अजय खूप दुःखात असल्याचे दिसत आहे. अजयने ट्विटरवरून ही दुःखद बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. सध्या अजय देवगण आणि त्याच्या घरातील सगळे सदस्य खूप दुःखात आहेत. अजयचा पाळीव कुत्रा कोको (pet dog coco) याचे निधन झाले आहे.

 

मला खूप वाईट वाटतं की काल रात्री मी माझा लाडका कोको गमावला. कोकोचं जाणं माझ्यासाठी मोठं नुकसान आहे. कुटुंब आणि मला नेहमीच तुझी आठवण येईल….’ असे ट्विट अजयने केले आहे. अजयचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

 

अजयच्या कुटुंबासाठी कोको फक्त एक पाळीव प्राणी नव्हता, तो देवगण कुटुंबातील एक खास सदस्य होता, असे अजयने सांगितलं होत. मात्र कोकोच्या निधनानंतर अजयाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

कोकोचे जाणे खूप मोठे नुकसानकारक आहे. कुटुंब आणि मी नेहमी तुझी आठवण ठेवू. अशाप्रकारे अजय देवगणने पॅट डॉग कोकोच्या मृत्यूची माहिती देताना शोक व्यक्त केला आहे. अजय देवगणला कुत्रे पाळण्याची खूप आवड असल्याची माहिती आहे. बातम्यांनुसार, अजय देवगणचा कोको त्याच्यासोबत अनेक वर्षांपासून राहत होता. अशा परिस्थितीत या मित्राचे जगातून जाणे अजयला दुखावणारे आहे.

 

अजय देवगणचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला:
अभिनेता अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलर पहिल्यानंतर अजय देवगणचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत, त्यामुळेच चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

 

या चित्रपटामध्ये अजयसोबत मुख्य भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट दिवाळीमध्ये 24 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button