आत्ताच्या घडामोडी

संपत्तीच्या बाबतीत अमिताभ बच्चनला टाकले मागे, ऐश्वर्या रायची संपत्ती पाहून धक्काच बसेल

दिल्ली | मिस वर्ल्ड बनलेली ऐश्वर्या राय बच्चन सध्या कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये झळकत आहे. ऐश्वर्या दिसायला तशी फारच सुंदर आहे आणि तिचा अभिनय देखील एकदम दमदार आहे. सध्या जरी ती चित्रपटांत जास्त सक्रिय नसली तरी तिने या आधी मोठ मोठ्या भूमिका पूर्ण पणे न्याय देत बजावल्या आहेत. अशात ऐश्वर्या आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी १० ते १२ कोटींचे मानधन घेते.

 

जसा अभिनय तसं मानधन या गणितावर ती तिचं मानधन ठरवते. तिने आजवर केलेल्या चित्रपटांतून ती कोट्यावधींची मालकीण झाली आहे. अशात एका अहवालनुसार ती एकूण १०० मिलियन डॉलर एवढ्या संपत्तीची मालकीण आहे. आणि बिग बी २९४६ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. तर आज या बातमीमधून ऐश्वर्याच्या संपत्ती विषयी अधिक जाणून घेऊ.

 

• बिझनेस वुमन –
ऐश्वर्या एक अभिनेत्री तर आहेच पण त्याचबरोबर ती एक उत्तम उद्योजक देखील आहे. तिने आता पर्यंत विंड पवार, हेल्थ केअर स्टार्टअप साठी गुंतवणूक केली आहे. तसेच एन्वायरन्मेंटल इंटेलीजेंस स्टार्टअपमध्ये ती एंजल इन्वेस्टर आहे आणि इथे तिने १ कोटींची गुतवणूक केली आहे.

 

• वाहने –
ऐश्वर्या राय बच्चनला
नवनवीन वाहने घेण्याचं फार वेड आहे. तिच्याकडे Mercedes Benz S350d Coupe ही गाडी आहे जीची किंमत १.६० कोटी एवढी आहे. तर ७.९५ कोटींची Rolls Royce Ghost ही गाडी देखील तिच्याकडे आहे जी तिला खूप आवडते. यासह तिच्याकडे Lexus LX 570, Audi A8L या चारचाकी गाड्या आहेत.

 

• स्थावर मालमत्ता –
ऐश्वर्या सध्या आपल्या कुटुंबासह जलसा या बंगल्यात राहते. ज्याची किंमत सध्या ११२ कोटी रुपये एवढी आहे. तसेच तिचा आणि अभिषेकचा जुमेराह गोल्फ इस्टेटमध्ये एक स्वतः चा व्हीला देखील आहे. यासह बिकेसिमध्ये देखील तिचं एक घर आहे. त्याची किंमत २१ कोटी रुपये एवढी आहे.

 

• ब्रँड एंडोर्समेंट –
ऐश्वर्याने आता पर्यंत अनेक ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत. ज्यामध्ये Longines, LUX, L’Oreal नक्षत्र ज्वेलरी, टायटन वॉच, लॅकमीची सौंदर्य प्रसाधने, पेप्सी फिलिप्स, लोढा ग्रूप आणि प्रेस्टिज या ब्रँड्सचा समावेश आहे. या सर्वांच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती दिवसाचे ७ कोटी रुपये घेते. म्हणजे वर्षाचे झाले ८० ते ९० कोटी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button