पाकिस्तान सोबतच्या विजयानंतर दिग्गज भारतीय खेळाडूचा निवृत्ती घेण्याचा निर्णय

मुंबई | क्रीडा विश्वातून सध्याच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या भागात सहभागी होण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असे म्हटले जात आहे. राहुल शर्मा या क्रिकेटपटूने सर्वच खेळांमधून काढता पाय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने सर्वजणचकीत झाले आहेत. राहुलने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
साल 2011 मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये वॉरियर्सकडून खेळत असताना त्याने सचिनची विकेट घेतली होती. त्यावेळी तो प्रचंड चर्चेत आला होता. सचिन सारख्या उत्तम खेळाडूला हरवणे हे सहज शक्य नव्हते. मात्र पहिल्याच मॅचमध्ये त्यानी सचिनची विकेट घेतल्याने सगळीकडे त्याचा बोलबाला होता. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व देखील त्याने पार पाडले. रोहित शर्मा आणि विराट कोहली आशा दमदार खेळाडूंबरोबर त्यानेही कामगिरी बजावली. 8 डिसेंबर 2011 मध्ये त्याचे पदार्पण झाले. भारतासाठी आपल्या मोठ्या नावाने त्याने प्रवेश घेतला.
त्याच्या उत्तम खेळांची जशी चर्चा होत होती तशीच त्याच्यावर होणाऱ्या वादांची देखील चर्चा होऊ लागली. अनिल कुंबळे या महान फिरकीपटू बरोबर देखील त्याची अनेक वेळा तुलना केली गेली. सतत वादाच्या विळख्यात अडकत असल्याने कालांतराने तो क्रिकेट विश्वापासून दूर जाऊ लागला. त्याच्या कारकिर्दीत त्याने दोन t20 सामने आणि 4 वनडे खेळले आहेत.