सिद्धू मुसेवालाच्या नंतर आणखी एका प्रसिध्द गायकाला गोळ्या घालून हत्या करण्याची धमकी

दिल्ली | सिद्धू सिंग मुसेवालाच्या हत्ये नंतर पंजाबी गायकांना धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरू झाले. यामध्ये आता आणखीन एका प्रसिद्ध गायकाला जिवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे हा गायक खूप घाबरला आहे. तसेच त्याने मुख्यमंत्र्यांना मदत आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
सिद्धू सिंग मुसेवाला प्रमाणे त्याला देखील गोळ्या झाडून त्याची हत्या केली जाणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या गायकाचा चाहता वर्ग देखील मोठ्या चिंतेत आहे. अनेक जण त्याला काही होऊ नये म्हणून सोशल मीडियावर जागरूक राहण्याचे आवाहन करत आहे. या गायकाचे नाव जानी जोहान असे आहे.
त्याने स्वतः ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लिहिलेले पत्र त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, ” माझ्या जिवाला धोका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मला आणि माझे व्यवस्थापक दीलराज सिंग यांना वारंवार सिद्धू सिंग मुसेवाला प्रमाणे हत्या केली जाईल असे धमक्यांचे फोन येत आहेत.”
पुढे त्याने लिहिले आहे की, ” कृपया मला प्रोटेक्ट करा. माझी सुरक्षा वाढवा. मी माझ्या कुटुंबाला आधीच अमेरिकेला पाठवले आहे. मी अजून भारतात आहे. मात्र माझी कधीही हत्या केली जाईल.” जानी हा खूप प्रसिद्ध गायक आहे. त्याने अनेक गाण्यांचे शो साईन केले आहेत. मात्र आता त्याला अशा धमक्या येत असल्याने तो अनेक शो रद्द करत आहे.
काही दिवसांपूर्वी त्याच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता. यावेळी तो त्याच्या मित्रांबरोबर एका ठीकणी जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीला एका मोठ्या ट्रकने धडक दिली. मात्र यात त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना घडल्या नंतर मी आणि माझे मित्र सुखरूप आहोत असे त्याने एक पोस्ट शेअर करत सांगितले होते. तसेच पुढे त्याने मी खूप जवळून मृत्यू पाहिला असे देखील सांगितले.