शैलेश लोढा यांच्या नंतर टप्पूने पण सोडली ‘तारक मेहता मालिका’

मुंबई | तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका अनेक कारणामुळे चर्चित आली आहे. एक तर प्रेक्षकांची सर्वात आवडती ही तारक मेहता का उलटा चष्मा मालिका आहे. या मालिकेतील अनेक महत्वाच्या पात्रांनी गेल्या काही दिवसात निरोप घेतला होता. या शो मधील शैलेश लोढा यांच्या सोबत टपुचे पात्र घेतलेला राज अनदकत हा पण बऱ्याच दिवसांपासून शो मधून गायब झाला तर दया भाभी पण गायब झाल्यात.
टपूचे पात्र करणारा राज गायब झाला हे प्रेक्षकांच्या लक्षात आले आहे. परंतु प्रेक्षक पुन्हा टपूच्या आगमनाची वाट पाहत होते. राज हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यानी त्याच्या Instagram account वर पोस्ट करत सांगितले आहे की सर्वांना माझ्या शुभेच्छा, आता वेळ आलीय.
ते म्हणजे मला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आणि बातम्यांना थांबिवण्याची, पुढे राज याने सांगितले की नीला फिल्म प्रोडक्शन आणि तारक मेहता का उलटा चष्मा याचसोबत जो माझा करार किंवा संबंध होता तो अधिकृतपणे संपलेला आहे. या दरम्यान मी खूप नवीन गोष्टी शिकलो आहे. माझ्या कारकर्दीची काही महत्वाचे क्षण या सेटवर घालवले आहे असे म्हणाला. तसेच काही चांगले मित्र ही याच काळात बनवले असे त्याने सांगितले.
पुढे आपल्या पोस्ट मध्ये राज लिहित म्हणाला की ज्यांनी मला साथ दिली त्यांचा मी आभारी आहे. माझे मित्र, कुटुंब तुम्ही सर्व चाहते आणि तारक मेहता का उलटा चष्मा ची टीम यांचे ही आभार मानले. शेवटी असेही लिहितो की तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी मी पुन्हा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे तुमचे प्रेम असेच राहुद्या. या सर्व राजच्या पोस्ट वरून हेच लक्षात येते की राज हा लवकरच नवीन कोणत्यातरी प्रोजेक्ट मधून तो लवकरच आपल्याला टिव्ही वरती पहायला मिळणार आहे. मात्र तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये तो दिसेल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.