बाबर आझम नंतर या तीन खेळाडू पैकी एकाला मिळणार कर्णधार पद

दिल्ली | पाकिस्तान (Pakistan) संघाचा कर्णधार (Captain) बाबर आझमने (Babar Azam) राजीनामा द्यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे. T20 विश्व चषकात (t20 WorldCup) त्याने चांगली कामगिरी केली नसल्यामुळे त्याने या पदाचा राजीनामा (resignation) द्यावा. अशी मागणी केली जात आहे. बाबर (babar Azam) ने स्वतः या पदावरून पाय उतार होऊन मोकळे पणाने बॅटिंग (Batting) करावी असा सल्ला पाकिस्तानी वरिष्ठ खेळाडूंकडून (Pakistan team) केली जात आहे.

Join WhatsApp Group

 

पाकिस्तान (Pakistan) आणि इंग्लंड (Engalnd) फायनल सामना झाला आणि त्यात बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली हा सामना पाकिस्तान हरले. त्यानंतर अनेक दिग्गजांनी संघ कर्णधार पदासाठी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला की, बाबर आझम ने स्वतः कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा. आणि मनमोकळे पणाने खेळावे. कर्णधार (Captain) पदाची संधी दुसऱ्याला द्यावी. असा सल्ला आफ्रिदी (Shahid Afridi) ने दिला आहे.

 

पुढे बोलताना आफ्रिदी म्हणाला की, बाबर याने t20 संघाची जबाबदारी सोडून एकदिवसीय आणि कसोटी (Kasoti) संघाचे नेतृत्व करावे. तो एक चांगला खेळाडू असल्याचे आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला आहे. तसेच आफ्रिदी ने पाकिस्तानी संघातील 3 खेळाडूंची नावे देखील घेतली आहेत. आफ्रिदीने पाकिस्तान हरल्यानंतर हा मोलाचा सल्ला दिला आहे.

 

बाबर नंतर कोण करणार संघाचे नेतृत्व – सध्या पाकिस्तान मध्ये बाबर ने राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. तसेच PCB याबाबत लवकर काहीतरी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बाबर जर कर्णधार पदावरून पाय उतार झाला तर शादाब खान (Shadab Khan), मोहम्मद रिझवान (Mohmmad Rizwan) किंवा शान मसूद (Shan Masud) या तीन खेळाडू पैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button